राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश पाठोपाठ आता महाराष्ट्रातही लम्पी स्किन ( Lumpy Skin Disease ) या आजाराचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. कोरोना, मंकीपॉक्स, स्वाईन फ्लू, मलेरिया यांसारख्या आजाराने आधीच त्रस्त झालेल्या जनतेची आता आणखीन डोकेदुखी वाढत आहे. यातही प्रामुख्याने देशातील बळीराजा प्रचंड चिंतेत आहे, याचे कारण लम्पी स्किन हा जनावरांना होणारा गंभीर आजार म्हणून समोर आला आहे.
मावळमध्ये फैलावतोय लम्पी स्किन;
लम्पी नावाच्या रोगाने राज्यात हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. ( Rapid Spread Of Lumpy ) मावळ तालुक्यातही हा आजार पसरताना दिसत असून उर्से गावात जनावरांना या रोगाची बाधा झाली आहे. मावळमधील उर्से गावातील 20 जनावरांना लम्पी विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर येत असून शासन नियमानुसार परिसरातील जनावरांच्या लसीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. ( Lumpy In Urse Village Maval Taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
लम्पी स्कीन आजाराची प्रमुख लक्षणे काय?
1. लम्पी स्कीन या आजारात जनावरांच्या डोळयातून आणि नाकातून पाणी येते
2. लम्पीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जनावरांना ताप येतो
3. जनावरे चारा खाणे, पाणी पिण्यास कमी होतात
4. हळूहळू डोके, मान, मायांग, कास या भागावर गाठी येतात
5. डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येतात, तसेच डोळ्यांची दृष्टी बाधित होते
6. पायावर तसेच कानामागे सूज येते
7. जनावरे दूध देण्यास कमी पडतात
लम्पी स्कीनची ताजी आकडेवारी;
देशात अनेक राज्यांमध्ये लम्पी स्कीनचा कहर वाढत चालला आहे. देशात 15 राज्यांत 175 जिल्ह्यांमध्ये लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. 15 लाखांहून अधिक गायींना या आजाराची लागण झाली आहे. तर आत्तापर्यंत 57 हजार गायींचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. ( Lumpy Skin Disease Rapid Spread Of Lumpy In Urse Village Maval Taluka )
अधिक वाचा –
ई-पीक पाहणी नोंदणीस शेतकऱ्यांचा निरुत्साह, मुळशीत स्वतः तहसीलदार पोहोचले बांधावर
ई-पीक पाहणी नोंदवण्याची अंतिम तारीख जवळ; मावळात शेतकऱ्यांना प्रशासनाकडून नोंदणीचे प्रशिक्षण