मावळ तालुक्याचे आमदार सुनिल शेळके यांच्यावर किशोर आवारे हत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार शेळकेंवर दाखल झालेला हा गुन्हा आकसापोटी आणि द्वेषापोटी असल्याचा आरोप शेळके यांच्या समर्थकांनी केला आहे. तसेच आमदार शेळके यांनी देखील त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. काही दिवसांपूर्वी आमदार सुनिल शेळके यांच्या समर्थकांनी तळेगाव दाभाडे इथे लाक्षणिक गर्दी करत निषेध नोंदवला होता.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
त्यानंतर आता सुनिल शेळकेंसाठी वडगाव मावळ येथील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरात रविवारी (दिनांक 28 मे) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आणि मोरया महिला प्रतिष्ठान मार्फत महाअभिषेक करण्यात येणार आहे. ( Maha Abhishek for MLA Sunil Shelke at Potoba Maharaj Temple in Vadgaon Maval )
“मावळचे कुटूंबप्रमुख जनसेवक लोकप्रिय आमदार सुनील आण्णा शेळके यांच्यावर झालेल्या खोट्या आरोपाचे संकट दूर होण्यासाठी मोरया प्रतिष्ठान व वडगाव शहरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने मावळचे श्रद्धास्थान असलेल्या आपल्या वडगाव मावळ चे ग्रामदैवत तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज मंदिरात महाअभिषेक करण्यात येणार आहे. तरी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे हि विनंती,” अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते तथा वडगाव नगरीचे नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी दैनिक मावळला दिली.
अधिक वाचा –
– ‘खरं हाती येईपर्यंत खोटं गावभर हिंडून आलेलं असतं..’, आमदार शेळकेंसाठी नगराध्यक्ष मयूर ढोरेंची भावूक पोस्ट, वाचा सविस्तर
– किशोर आवारे हत्या प्रकरणातील एसआयटी प्रमुख प्रेरणा कट्टे यांची बदली रद्द, नेमके काय घडले? वाचा