पुढील वर्षी म्हणजेच 2024 मध्ये लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. कर्नाटक निकालानंतर राज्यातील महाविकासआघाडीचे घटकपक्ष अधिक जवळ आल्याचे दिसत असून लोकसभा आणि विधानसभा या दोन्हीसाठी विचारमंथन सुरु असल्याचे दिसून येत आहे. मविआच्या दिग्गज नेत्यांच्या सातत्याने बैठका पार पडत असून यात लोकसभेसाठी काही फॉर्म्यूला ठरला असल्याची चर्चा सध्या माध्यमांत होत आहे. परंतू कुठल्याही बड्या नेत्याने याला दुजोरा दिला नाही. ( maha vikas aghadi candidate for Lok Sabha ? )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अशातच मविआच्या लोकसभेच्या जागावाटपाची आणि संभाव्य उमेदवारांची एक यादी सोशल मीडियावर व्हायरल होत असून या यादीने सर्वांनाच धक्का दिला आहे. ही यादी फेक असल्याचे जरी मविआच्या नेत्यांनी म्हटले असले तरीही यानिमित्ताने काही मतदारसंघाबाबत खमंग चर्चा होत असून या मावळ लोकसभेचा देखील समावेश आहे. ( list viral on social media )
काय आहे ही यादी?
महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. त्यामुळे मविआच्या तिन्ही घटक पक्षांचा 16-16-16 जागांचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली होती. परंतू मविआच्या नेत्यांनी ही बातमी खोटी असल्याचे म्हटले. असे असले तरीही आता सोशल मीडियात महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबद्दल एक यादी व्हायरल होत आहे. त्यामुळे या अनुषंगाने काही जागा आणि उमेदवार यांची नावे देखील लिक झाली आहेत, ज्यात मावळ लोकसभेसाठी पार्थ पवार हे पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडून उमेदवार असतील असे दिसते. तर शिरुरमधून डॉ. अमोल कोल्हे यांनी संधी मिळणार असल्याचे यादीत दिसत आहे.
संबंधित व्हायरल होणाऱ्या यादीत असा दिसतंय की, लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला सर्वाधिक 16, राष्ट्रवादी काँग्रेसला 15, ठाकरे गटाला 13 जागा निश्चित करण्यात आल्या, तर राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाला एक आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना 2 जागा देण्यात आलीये, असे यादीवरुन दिसत आहे. ( ncp parth pawar name for maval again )
जागा वाटपाच्या या व्हायरल यादीत नेमकी कुणाला संधी?
- नंदुरबार- के. सी. पाडवी (काँग्रेस)
- धुळे- कुणाल पाटील (काँग्रेस)
- जळगाव- गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी)
- रावेर- एकनाथ खडसे (राष्ट्रवादी)
- बुलढाणा- नरेंद्र खेडेकर (शिवसेना-ठाकरे गट)
- अकोला- सुनील फाटकर (वंचित बहुजन आघाडी)
- अमरावती- दिनेश बूब (शिवसेना-ठाकरे गट)
- वर्धा- रणजीत कांबळे (काँग्रेस)
- गडचिरोली- धर्मराव बाबा आत्राम (राष्ट्रवादी)
- रामटेक- नितीन राऊत (काँग्रेस)
- नागपूर- नाना पटोले (काँग्रेस)
- गोंदिया- प्रफुल पटेल (राष्ट्रवादी)
- यवतमाळ- संजय देशमुख (शिवसेना-ठाकरे गट)
- हिंगोली- प्रज्ञा सातव (काँग्रेस)
- परभणी- संजय जाधव (शिवसेना- ठाकरे गट)
- संभाजीनगर- अंबादास दानवे (शिवसेना-ठाकरे गट)
- धाराशिव- ओमराजे निंबाळकर (शिवसेना-ठाकरे गट)
- जालना- कल्याण काळे (काँग्रेस)
- नांदेड- अशोक चव्हाण (काँग्रेस)
- लातूर- मच्छिंद्र कामत (काँग्रेस)
- सोलापूर- प्रणिती शिंदे (काँग्रेस)
- बीड- धनंजय मुंडे (राष्ट्रवादी)
- कोल्हापूर- संजय पवार ( शिवसेना-ठाकरे गट)
- दिंडोरी- नरहरी झिरवाळ (राष्ट्रवादी)
- नाशिक- छगन भुजबळ (राष्ट्रवादी)
- पालघर- बळीराम जाधव (बहुजन विकास आघाडी)
- भिवंडी- सुरेश टावरे (काँग्रेस)
- कल्याण- आनंद परांजपे (राष्ट्रवादी)
- ठाणे- राजन विचारे (राष्ट्रवादी)
- मुंबई उत्तर- संजय निरुपम (काँग्रेस)
- मुंबई उत्तर पश्चिम- अमोल कीर्तिकर (शिवसेना-ठाकरे गट)
- मुंबई उत्तर पूर्व- संजय दिना पाटील (शिवसेना-ठाकरे गट)
- मुंबई उत्तर मध्य- प्रिया दत्त (काँग्रेस)
- मुंबई दक्षिण मध्य- प्रकाश आंबेडकर ( वंचित बहुजन आघाडी)
- मुंबई दक्षिण- अरविंद सावंत ( शिवसेना-ठाकरे गट)
- रायगड- सुनील तटकरे ( राष्ट्रवादी)
- मावळ- पार्थ पवार ( राष्ट्रवादी)
- पुणे- रविंद्र धंगेकर (काँग्रेस)
- बारामती- सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी)
- शिरुर- अमोल कोल्हे (राष्ट्रवादी)
- अहमदनगर- निलेश लंके (राष्ट्रवादी)
- शिर्डी- बबनराव घोलप (शिवसेना-ठाकरे गट)
- माढा- संजय शिंदे (राष्ट्रवादी)
- सांगली- विश्वजीत कदम ( काँग्रेस)
- सातारा- रामराजे निंबाळकर (राष्ट्रवादी)
- रत्नागिरी- विनायक राऊत (शिवसेना-ठाकरे गट)
- हातकणंगले- राजू शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी संघटना)
- चंद्रपूर- बाळू धानोरकर (काँग्रेस)
अधिक वाचा –
– आमदार बच्चू कडू यांना मंत्रिपदाचा दर्जा! नाराजी दूर करण्याचा प्रयत्न? वाचा नेमकं काय झालंय
– मावळ तालुक्यात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम, पाहा तुमच्या भागात कधी आणि कुठे असेल कॅम्प