व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, October 14, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आमदार बच्चू कडू यांना मंत्रिपदाचा दर्जा! नाराजी दूर करण्याचा प्रयत्न? वाचा नेमकं काय झालंय

प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि सध्याच्या राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचे समर्थक असलेले आमदार बच्चू कडू यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 24, 2023
in महाराष्ट्र
Bacchu-Kadu

Photo Courtesy : IG / Bacchu Kadu


प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि सध्याच्या राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचे समर्थक असलेले आमदार बच्चू कडू यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार हा मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. लांबलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर सातत्याने बोट ठेवून शिंदे-फडणवीस सरकारला घरचा आहेर देणारे बच्चू कडू यांना शांत करण्याचा किंवा त्यांची नाराजी दूर करण्याचा हा एक प्रयत्न असल्याची चर्चा यामुळे राजकीय वर्तूळात सुरु झाली आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

‘यासाठी’ देण्यात आला मंत्रिपदाचा दर्जा

राज्यात जून महिन्यात दिव्यांग कल्याण विभागाद्वारे ‘दिव्यांगाच्या दारी’ अभियान राबवण्यात येणार आहे. यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून समितीचे अध्यक्ष पद आणि प्रमुख मार्गदर्शक हे आमदार बच्चू कडू यांना दिले जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार बच्चू कडू यांना मंत्री पदाचा दर्जा जाहीर करण्यात आला आहे. शासनाने यासंबधी परिपत्रक काढून कडू यांना मंत्री पदाचा दर्जा जाहीर केला आहे. मागील वीस वर्षांपासून बच्चू कडू हे दिव्यांगांसाठी लढा देत आहेत. त्यांच्याच रेट्यामुळे राज्यात स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करण्यात आला. ( MLA Bacchu Kadu given Ministerial Status By Shinde Fadnavis Government Maharashtra )

नाराजी नेमकी काय?

तत्कालीन ठाकरे सरकारमध्येही बच्चू कडू हे मंत्री होते. परंतू एकनाथ शिंदे यांच्या बंडात सामील होत त्यांनी ठाकरेंची साथ सोडली. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आले, तेव्हा त्याला कडूंनी पाठींबा दिला. मात्र शिंदेच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना संधी न दिल्याने त्यांची नाराजी उघडपणे दिसून आली. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा लांबत गेल्याने त्यांनी अनेकदा सरकारला घरचा आहेर दिला होता. त्यांची हीच नाराजी कमी करण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

अधिक वाचा –
– दुचाकी चालवणाऱ्या प्रत्येकाने ही बातमी नक्की वाचा, 24 मे हा दिवस असणार अत्यंत महत्वाचा
– मावळ तालुक्यात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम, पाहा तुमच्या भागात कधी आणि कुठे असेल कॅम्प


dainik maval jahirat

Previous Post

दुचाकी चालवणाऱ्या प्रत्येकाने ही बातमी नक्की वाचा, 24 मे हा दिवस असणार अत्यंत महत्वाचा

Next Post

लोकसभेसाठी मविआचे उमेदवार ठरले? सोशल मीडियावर यादी व्हायरल, मावळमधून पार्थ पवारांचे नाव, चर्चांना उधाण

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
maha-vikas-aghadi

लोकसभेसाठी मविआचे उमेदवार ठरले? सोशल मीडियावर यादी व्हायरल, मावळमधून पार्थ पवारांचे नाव, चर्चांना उधाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shekru found in weak state in Vadgaon Maval Forest Range saved released back into wild

Shekaru Rescue : वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त

October 13, 2026
Accident

घोरवडेश्वर मंदिर दर्शन करून घरी परतताना काळाचा घाला! सख्ख्या बहिण-भावाचा पुणे-मुंबई महामार्गावर अपघाती मृत्यू

October 13, 2026
Accused arrested after 18 years for murdering his wife Lonavala Police

Lonavala : दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा खून करून पसार झालेल्या आरोपीला तब्बल १८ वर्षांनंतर अटक

October 13, 2026
Ghatsthapana observed amidst devotional atmosphere in temples across villages of Maval Taluka

मावळ तालुक्यातील गावोगावी मंदिरांमध्ये भक्तिमय वातावरणात “घटस्थापना”

October 12, 2026
Pune Zilla Parishad ranks second in state under Chief Minister Samruddha Panchayat Raj Abhiyan

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात पुणे जिल्हा परिषद राज्यात द्वितीय

October 12, 2026
Launch of an audiobook providing information about Tikona Fort Maval

तिकोनागडाची माहिती देणाऱ्या ऑडिओ बुकचे उद्घाटन

October 11, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.