Dainik Maval News : सालाबादप्रमाणे यंदाही २५६९ व्या बुद्ध पौर्णिमेनिमित्त कार्ला लेणी, मावळ येथे भिक्खू संघाच्या उपस्थितीत महाबुद्धवंदनेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात आदरणीय भंते धम्मानंद यांच्यासह ३० श्रामणेर, हजारो उपासक – उपासिका व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
सकाळी १० वाजता “महाबुद्धवंदना” व सुत्तपठण घेण्यात आले. त्यानंतर आदरणीय भंते धम्मानंद यांनी उपस्थित उपासकांना धम्मदेसना देत भगवान गौतम बुद्ध यांच्या विश्वशांतीचा मार्ग सांगितला. तसेच अहिंसा, मैत्री-भाव, पंचशील, अष्टांग मार्ग यांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्व लेणी संवर्धन संघटना यांच्यातर्फे भिक्खू संघास व उपासकांना भोजनदान करण्यात आले.
कार्ला लेणी लोणावळ्याजवळ वेहेरगाव येथे बौद्ध भिक्खुसाठी इ.स. पूर्व पहिल्या शतकात कोरण्यात आली. कार्ला लेणीमध्ये जम्बुव्दिपातील सर्वात मोठे चैत्यगृह व स्तूप कोरण्यात आलेला आहे. कार्ला लेणी थेरवाद व महायान या दोन्हीही प्रमुख बौद्ध शाखेच्या एकीचे प्रतीक मानले जाते. या लेणीतील भगवान बुद्ध, बोधिसत्व, हत्ती, पिंपळाकृती कमानी, बौद्ध राजे-राण्या, मोठे स्तंभ अशी सुबक व कोरीव शिल्पे प्राचीन भारतीय कलेची साक्ष देतात.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– दहावीचा निकाल जाहीर : किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, किती उत्तीर्ण झाले, विभागनिहाय निकाल ; वाचा सविस्तर निकाल । SSC Result 2025
– दहावी परीक्षेत पवना विद्या मंदिरची विद्यार्थिनी पूर्वा घरदाळे पवनानगर केंद्रात प्रथम ! ग्रामीण भागात यंदाही मुलींचीच बाजी
– वाढदिवसाच्या आदल्या रात्रीच काळाचा घाला ; कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाला कंटेनरने चिरडले ; वडगाव मावळ येथील दुर्दैवी घटना
– मावळात बेकायदेशीर वन्यजीव शिकारीचा पर्दाफाश ! शस्त्रास्त्रे व मांस जप्त, आरोपी अटकेत ; वनविभागाची मोठी कारवाई