व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, February 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पिंपरी, चिंचवड आणि मावळ विधानसभा शिवसेनेची आढावा बैठक ; उद्योग मंत्री उदय सामंत यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

संघटनेसाठी दररोज एक तास द्या, ताकत देऊ ; उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या कार्यकर्त्यांना सूचना

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 16, 2025
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
Pimpri Chinchwad Maval assembly Shiv Sena review meeting Uday Samant guidance to party workers

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पूर्वी एका रात्रीत सभासद नोंदणी केली जात होती. समोरचे नेतृत्व ही नोंदणी कशी झाली हे बघणारे नव्हते. आताचे नेतृत्व संघटना कशी वाढविली जाते हे डोळसपणे बघणारे आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः लक्ष ठेवून सभासद नोंदणी करून घेत आहेत. नोंदणीची पडताळणी करत आहेत.काम करणारे आणि काम चुकार कार्यकर्ते हे आम्हाला ओळखता येते. त्यामुळे संघटनेसाठी दररोज एक तास द्यावा. ताकत देण्याचे काम आमच्याकडून केले जाईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री, पुणे जिल्ह्याचे संपर्क नेते उदय सामंत यांनी दिली.

  • पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेची गुरुवारी आढावा बैठक सामंत यांच्या उपस्थितीत कासारवाडी येथे झाली. यावेळी शिवसेना उपनेते, खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह पिंपरी, चिंचवड आणि मावळ परिसरातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

मंत्री उदय सामंत म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेची निवडणूक लढविली. महायुतीला चांगले यश मिळाले. लाडकी बहिणीसह विविध लोकोपयोगी योजना राबविल्या. त्याचा शिवसेनेसह महायुतीला मोठा फायदा झाला आहे. केवळ शिवसेना सदस्य नोंदणीचा आढावा घेण्यासाठी आलो नाही, तर कार्यकर्त्यांनां न्याय देण्यासाठी आलो आहे. कार्यकर्त्यांना बळ दिले जाईल. मी आणि खासदार श्रीरंग बारणे कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी आहोत. कार्यकर्त्यांना बळ देणे शिवसेनेचे काम आहे. कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम करावे. पक्षासाठी दररोज एक तास द्यावा. त्यामुळे संघटन अधिक मजबूत, सक्षम होईल.

पूर्वी एका रात्रीत सभासद नोंदणी केली जात होती. समोरचे नेतृत्व ही नोंदणी कशी झाली हे बघणारे नव्हते. आताचे नेतृत्व संघटना कशी वाढविली जाते हे डोळसपणे बघणारे आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः लक्ष ठेवून सभासद नोंदणी करून घेत आहेत. नोंदणीची पडताळणी करत आहेत. शिवसेनेचा निवडणुकांचा पाया हा सभासद नोंदणी आहे. त्यामुळे ती प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे. शिंदे कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका घेतात. त्याच्या दहा टक्के भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे. घराघरामध्ये जाऊन सभासद नोंदणी करावी. त्यामुळे आपले, परके कळतील. घरात जाऊन आपला विचार रुजविला पाहिजे. काम करणारे आणि काम चुकार कार्यकर्ते हे आम्हाला ओळखता येते. सर्वांना विश्वासात घेऊन शासकीय समित्यांची पदे वाटली जातील. जो काम करेल, ज्याची ताकद असेल तोच महापालिकेची निवडणूक लढविणार आहे, असेही सामंत म्हणाले.

खासदार बारणे म्हणाले, आगामी महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना सदस्य नोंदणी हे चांगले माध्यम आहे. पिंपरी, चिंचवड, मावळमध्ये घरोघरी जाऊन सभासद नोंदणी करावी. त्याचा आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत फायदा होईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे किती काम करतात, त्याचे अनुकरण करून पक्षासाठी काम करावे. पूर्वी घर बसल्या फॉर्म भरून सभासद नोंदणी केली जात होती. इतर पक्षही तसे करतात. परंतु, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच घरोघरी जाऊन ऑनलाइन सभासद नोंदणी केली जाते. सदस्य नोंदणीत मावळ मतदारसंघ राज्यात 4 स्थानावर आहे. संघटनेसाठी थोडा वेळ दिला तर 100 टक्के सभासद नोंदणी पूर्ण होईल.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– दहावीचा निकाल जाहीर : किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, किती उत्तीर्ण झाले, विभागनिहाय निकाल ; वाचा सविस्तर निकाल । SSC Result 2025
– दहावी परीक्षेत पवना विद्या मंदिरची विद्यार्थिनी पूर्वा घरदाळे पवनानगर केंद्रात प्रथम ! ग्रामीण भागात यंदाही मुलींचीच बाजी
– वाढदिवसाच्या आदल्या रात्रीच काळाचा घाला ; कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाला कंटेनरने चिरडले ; वडगाव मावळ येथील दुर्दैवी घटना
– मावळात बेकायदेशीर वन्यजीव शिकारीचा पर्दाफाश ! शस्त्रास्त्रे व मांस जप्त, आरोपी अटकेत ; वनविभागाची मोठी कारवाई


Previous Post

‘नियोजन करून दुपारी दीडची लोकल पुन्हा सुरू’, खासदार श्रीरंग बारणे यांच्या रेल्वे अधिकाऱ्यांना सूचना

Next Post

कार्ला लेणी येथे २५६९ व्या बुद्ध पौर्णिमेनिमित्त हजारोंच्या उपस्थितीत ‘महाबुद्धवंदना’ संपन्न । Karla News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Mahabuddha Vandana in Karla Caves on occasion of Buddha Purnima

कार्ला लेणी येथे २५६९ व्या बुद्ध पौर्णिमेनिमित्त हजारोंच्या उपस्थितीत 'महाबुद्धवंदना' संपन्न । Karla News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Chief Minister reviews general district annual plans of Pune district

मुख्यमंत्र्यांकडून पुणे जिल्ह्याच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा

February 15, 2026
Prostitution business on old Pune-Mumbai highway Many dens in Talegaon Vadgaon Dehu Road Somatane

Maval Crime : वेश्या व्यवसायाच्या उद्देशाने लैंगिक हावभाव करून सार्वजनिक शिष्ठाचाराचा भंग केल्याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हे

February 15, 2026
Lord-Shankar-Temple-In-Maval-Taluka

मावळ तालुक्यातील ‘ही’ प्रसिद्ध शिवमंदिरे प्रत्येक शिवभक्ताने आयुष्यात एकदा तरी नक्की पाहावीत, जाणून घ्या । Famous Shiva Temples in Maval Taluka

February 15, 2026
Raje Shiv Chhatrapati Jayanti Festival 2026 Committee at Vadgaon Maval

वडगाव मावळ येथील राजे शिवछत्रपती जयंती महोत्सव २०२६ समिती अध्यक्षपदी कुलदीप ढोरे, कार्याध्यक्षपदी संतोष भिलारे

February 14, 2026
On occasion of Mahashivratri Akhand Harinam saptah at Shri kshetra Ghoravadeshwar Maval

महाशिवरात्री निमित्त PMPML कडून मावळातील श्री क्षेत्र घोरवडेश्वर इथे जाण्यासाठी रविवारी विशेष बससेवा

February 14, 2026
Crime

चुलत भावाकडून तरूणाचा खून, आरोपी फरार ; मावळातील धक्कादायक घटना, पोलिसांकडून तपास सुरू

February 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.