Dainik Maval News : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली यादी आज (दि.16) जाहीर होणार असल्याची माहिती समोर येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर जे आमदार अजित पवार यांच्या सोबत राहिले आणि जे अजूनही अजित दादा यांच्याच पक्षात आहेत, त्या विद्यमान सर्व आमदारांना पक्षाकडून तिकीट मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे.
मंगळवारी (दि.15) केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. तसेच कालपासूनच राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केल्या प्रमाणे 20 नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान होईल आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी होईल. दरम्यान राज्यातील महायुती आणि महाविकासआघाडी या दोन्ही आघाड्यांचे जागा वाटप अद्याप जाहीर झालेले नाही. परंतु जवळपास ते पूर्ण झाले असून कोणत्याही क्षणी घोषणा होइल असे सांगितले जात आहे. अशाच अजित पवार यांच्या पक्षाकडून कोणाला तिकीट मिळेल, याची एक संभाव्य यादी समोर आली आहे.
अजित पवार गटाच्या पहिल्या यादीत कोणकोणत्या उमेदवारांना तिकीट मिळणार?
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तिकीट मिळणारे संभाव्य उमेदवार खालीलप्रमाणे;
1. संग्राम जगताप
2. किरण लहामटे
3. आशुतोष काळे
4. अनिल पाटील
5. राजेश पाटील
6. दिलीप बनकर
7. संजय बनसोडे
8. अतुल बेनके
9. दत्तात्रय भरणे
10. छगन भुजबळ
11. यशवंत माने
12. धनंजय मुंडे
13. हसन मुश्रीफ
14. दिलीप मोहिते
15. दिलीप वळसे
16. सुनील शेळके
17. प्रकाश सोळंके
18. माणिकराव कोकाटे
19. मनोहर चांद्रिकेपुरे
20. मकरंद पाटील
21. नरहरी झिरवाळ
22. सुनील टिंगरे
23. अदिती तटकरे
24. चेतन तुपे
25. दौलत दरोडा
26. राजू नवघरे
27. इंद्रनील नाईक
28. मानसिंग नाईक
29. शेखर निकम
30. अजित पवार
31. नितीन पवार
32. बाबासाहेब पाटील
33. सरोज अहिरे
34. धर्माबाबा आत्राम
35. बाळासाहेब अजबे
36. राजू कारेमोरे
37. अण्णा बनसोडे
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– वडगाव मावळ येथे आजपासून श्री दत्त मंदिर जीर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा । Vadgaon Maval
– मावळ विधानसभा मतदारसंघात एकूण 3 लाख 80 हजार 297 मतदार ; तळेगावात होणार मतमोजणी । Maval Vidhan Sabha
– महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचं बिगुल वाजलं : 20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला मतमोजणी, आजपासून आचारसंहिता लागू । Maharashtra Vidhansabha Election