व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, February 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘मोफत गणवेश’, शिंदे सरकारचं राज्यातील विद्यार्थ्यांना मोठं गिफ्ट! शिक्षणसेवकांच्या पगारातही भरघोस वाढ, वाचा अधिक

अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प होता, त्यामुळे अर्थसंकल्पात नेमक्या काय घोषणा होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 9, 2023
in महाराष्ट्र
Free-Uniform-For-Students

Photo - Dainik Maval Graphics Team


महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन 2023 सध्या मुंबईत सुरु आहे. आज (गुरुवार, 9 मार्च) रोजी अधिवेशनाच्या सातव्या दिवशी, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प होता, त्यामुळे अर्थसंकल्पात नेमक्या काय घोषणा होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.

अर्थसंकल्पाच्या सुरुवातीलाच संत तुकाराम महाराज यांच्या बीज दिनी त्यांना वंदन करुन देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पाच्या वाचनाला सुरुवात केली. यावेळी राज्याचा यंदाचा अर्थसंकल्प हा पाच घटकांवर म्हणजेच पंचामृतांवर आधारित असेल, असे फडणवीस यांनी सांगितले. त्यानंतर राज्यातील विविध घटक आणि क्षेत्राशी संबंधित तरतुदींचे वाचन करत असतानाच फडणवीसांनी शिक्षण क्षेत्रातील अनेक नव्या तरतुदी आणि अनेक मोठ्या घोषणा केल्या. ( Maharashtra Budget 2023 Devendra Fadnavis Announced Free Uniform For Students Increase In Salary of Education Servants )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

विद्यार्थ्यांना मोफत गणवेश…

एकनाथ शिंदे सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात विद्यार्थ्यांना मोठे गिफ्ट देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या रकमेत मोठी वाढ करत असतानाचा इयत्ता आठवी पर्यंत आता मोफत गणवेश देण्यात येणार आहेत.

– इयत्ता 5 ते 7 वी शिष्यवृत्ती रक्कम एक हजारवरुन 5 हजार रुपये
– इयत्ता 8 ते 10 वी शिष्यवृत्ती रक्कम दीड हजारवरुन हजारवरुन 7500 हजार रुपये
– स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता आठवीपर्यंत सर्व प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांना गणवेश मोफत दिले जाणार.

हेही वाचा – गुडन्यूज! शिंदे सरकारची नवी ‘लेक लाडकी’ योजना, मुलीच्या जन्मापासून ते 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत मिळणार पैसे, वाचा सविस्तर

शिक्षणसेवकांच्या मानधनात मोठी वाढ…

मागील अनेक वर्षांपासून शिक्षणसेवकांच्या मानधनात वाढ व्हावी, यासाठी मागणी होत होती. अखेर शिंदे सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात ही मानधन वाढ करण्यात आली आहे.

शिक्षणसेवकांच्या मानधनात सरासरी 10 हजार रुपयांची वाढ

– प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षणसेवक : 6 हजारवरुन 16 हजार रुपये
– माध्यमिक शिक्षण सेवक : 8 हजारवरुन 18 हजार रुपये
– उच्च माध्यमिक शिक्षण सेवक : 9 हजारवरुन 20 हजार रुपये

अधिक वाचा –

– शिंदे-फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पात मावळ तालुक्यासाठी खास तरतूद, ‘या’ कार्यासाठी तब्बल 25 कोटी जाहीर
– ‘महा’बजेट 2023 : शिंदे सरकारची मोठी घोषणा, महात्मा फुले जन आरोग्य योजनेची मर्यादा वाढवली, आता इतक्या लाखांपर्यंत मोफत उपचार
– ‘महा’बजेट 2023 : फडणवीसांचे मोठे गिफ्ट, शेतकऱ्यांसाठी ‘नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना’ जाहीर, वर्षाला मिळणार ‘इतके’ पैसे


Previous Post

लायन्स क्लबकडून जागतिक महिला दिनी विद्यार्थिनींसाठी मोफत सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनचे वाटप

Next Post

महागाव इथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा, महिलांसाठी विशेष व्यवसाय विकास प्रशिक्षण शिबिरही संपन्न

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Business-Development-Training-Camp-For-womens

महागाव इथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा, महिलांसाठी विशेष व्यवसाय विकास प्रशिक्षण शिबिरही संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Chief Minister reviews general district annual plans of Pune district

मुख्यमंत्र्यांकडून पुणे जिल्ह्याच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा

February 15, 2026
Prostitution business on old Pune-Mumbai highway Many dens in Talegaon Vadgaon Dehu Road Somatane

Maval Crime : वेश्या व्यवसायाच्या उद्देशाने लैंगिक हावभाव करून सार्वजनिक शिष्ठाचाराचा भंग केल्याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हे

February 15, 2026
Lord-Shankar-Temple-In-Maval-Taluka

मावळ तालुक्यातील ‘ही’ प्रसिद्ध शिवमंदिरे प्रत्येक शिवभक्ताने आयुष्यात एकदा तरी नक्की पाहावीत, जाणून घ्या । Famous Shiva Temples in Maval Taluka

February 15, 2026
Raje Shiv Chhatrapati Jayanti Festival 2026 Committee at Vadgaon Maval

वडगाव मावळ येथील राजे शिवछत्रपती जयंती महोत्सव २०२६ समिती अध्यक्षपदी कुलदीप ढोरे, कार्याध्यक्षपदी संतोष भिलारे

February 14, 2026
On occasion of Mahashivratri Akhand Harinam saptah at Shri kshetra Ghoravadeshwar Maval

महाशिवरात्री निमित्त PMPML कडून मावळातील श्री क्षेत्र घोरवडेश्वर इथे जाण्यासाठी रविवारी विशेष बससेवा

February 14, 2026
Crime

चुलत भावाकडून तरूणाचा खून, आरोपी फरार ; मावळातील धक्कादायक घटना, पोलिसांकडून तपास सुरू

February 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.