Dainik Maval News : मावळ तालुक्यासह खेड, शिरूर तालुक्यातील बहुसंख्य नागरिकांच्या हिताचा व जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला तळेगाव – चाकण – शिक्रापूर महामार्गाचा प्रश्न आता जवळपास मार्गी लागल्यात जमा आहे. सोमवारी (दि.10) राज्याच्या अर्थसंकल्प जाहीर करीत असताना उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी तळेगाव – शिक्रापूर महामार्गाबाबत मोठी घोषणा केली आहे. ( Maharashtra Budget 2025 )
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (दि.10) विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात मावळ तालुक्याशी संबंधित तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावरील तळेगाव ते चाकण या 25 किलोमीटर लांबीत चार पदरी उन्नत मार्ग प्रस्तावित असल्याचे अजित पवार यांनी जाहीर केले. यामुळे तळेगाव ते चाकण मार्गावर होणारी वाहतूक कोंडी लवकरच सुटणार आहे. ( Ajit Pawar Big announcement )
काय म्हटले अजित पवार?
पुणे ते शिरुर या 54 किलोमीटर लांबीच्या 7 हजार 515 कोटी रुपये किंमतीच्या उन्नत मार्गाचे बांधकाम हाती घेण्यात येत आहे. दरम्यान, तळेगाव-चाकण-शिक्रापूर या रस्त्याच्या तळेगाव ते चाकण या 25 किलोमीटर लांबीत चार पदरी उन्नत मार्ग प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी 6 हजार 499 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, असे अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादरीकरणावेळी सांगितले. ( Talegaon Chakan Shikrapur Road )
आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना यश
तळेगाव ते चाकण दरम्यान रस्त्याचे रुंदीकरण करणे, फ्लायओव्हर बांधणे यासाठी आमदार सुनील शेळके हे आमदारकीच्या पहिल्या टर्मपासून प्रयत्नशील होते. केंद्रीय रस्ते विकास व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणे, मुख्यमंत्र्यांची भेट घेणे, जिल्हा नियोजन समितीत विषय मांडणे, कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा, विधानसभेत मुद्दा मांडणे या सर्व प्रकारे आमदार सुनील शेळके यांनी हा मुद्दा लावून धरला होता. त्यांच्या प्रयत्नांना आता यश मिळताना दिसत आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाबाबत नवीन डेडलाईन ; 10 एप्रिलपर्यंत भूसंपादन पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश । Lonavala News
– संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सव सोहळा ; भंडारा डोंगर येथे आजपासून गाथा पारायण व कीर्तन महोत्सव
– रसायनमिश्रीत सांडपाणी नदीत सोडणाऱ्या उद्योगांवर कठोर कारवाई ; पवना, इंद्रायणी नदी प्रदूषणावर पर्यावरण मंत्र्यांची भूमिका