मुंबई बॉम्बस्फोट ( Mumbai Blast ) प्रकरणात फाशीची शिक्षा झालेला आरोपी याकूब मेमन ( Terrorist Yakub Memon ) याच्या कबरीचे झालेले सुशोभीकरण ( Grave Renovation ) हा मुद्दा सध्या राज्यात प्रचंड गाजत आहे. याकूब मेमनच्या सुशोभीकरणामुळे राज्यात राजकीय आरोपप्रत्यारोप सुरु झाले असून या सुशोभीकरणास महाविकास आघाडी सरकारची अलिखित परवानगी होती, असा आरोप भारतीय जनता पार्टीने केला.
त्याला तत्कालीन ठाकरे सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे यांनी उत्तर देत, मेमनचा मृतदेह दफनविधीसाठी का दिला, असा सवाल उपस्थित करत भाजपवरच पलटवार केला. दरम्यान या सर्व प्रकरणावर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी प्रतिक्रिया दिली असून मोठे भाष्य केले आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
उधव ठाकरे मुख्यमंत्री थे .उस क़ाल में मुंबई में पाकिस्तान के इशारे पर 1993 में बंबकांड करने वाला ख़ूँख़ार आतनवादी याकूब मेमन की कबर मझार में तब्दील हो गयी .
यही है इनका मुंबई से प्यार , यही इनकी देश भक्ती ?उधव ठाकरे समेत शरद पवार तथा राहुल गांधी माफ़ी माँगे मुंबई की जनता की pic.twitter.com/TAQNhBb36G
— Ram Kadam ( modi ka parivar ) (@ramkadam) September 7, 2022
याकूब मेमनच्या कबरीच्या सुशोभीकरणाबद्दल कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेला सूचना दिल्या आहेत. तसेच, ‘याकुब हा स्फोटातील आरोपी असून त्याला फाशी दिली आहे. त्याचे उदात्तीकरण महाराष्ट्रात कधीच खपवून घेऊ शकत नाही. त्यामुळे कायदेशीर कारवाईचे आदेश दिले आहेत’, असे शिंदेंनी सांगितले.
संपूर्ण प्रकरण काय?
दक्षिण मुंबईतील मरिन लाईन्स परिसरातील बडा कब्रिस्तानमध्ये मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी याकूब मेमनची कबर आहे. या कबरीला मार्बल्स आणि एलईडी लाईट्स लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. फुलांच्या पाकळ्यांनी ही कबर सजवण्यात आली होती. ही घटना उघडकीस येताच सर्वत्र खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत येथील एलईडी लाईट्स काढून टाकल्या. ( Maharashtra Cm Eknath Shinde On Mumbai Blast Terrorist Yakub Memon Grave Renovation )
अधिक वाचा –
उद्धव ठाकरेंवर प्रचंड जहरी टीका; “बापाचे नाव नसते तर एखाद्या स्टुडिओमध्ये फोटो..”
तब्बल 70 वर्षे ब्रिटनच्या महाराणी राहिलेल्या एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन; जगभरातून श्रद्धांजली