व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, March 12, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

दिनांक 16 ऑक्टोबरला फॉर्म भरायला सुरुवात ते 6 नोव्हेंबरला मतमोजणी! वाचा ग्रामपंचायत निवडणूकांची संपूर्ण कार्यक्रमपत्रिका

महाराष्ट्रातील सुमारे 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ह्यासाठी दिनांक 5 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 3, 2023
in महाराष्ट्र, पुणे, लोकल
Grampanchayat-Election-In-Maharashtra

Photo Courtesy : File Photo


महाराष्ट्रातील सुमारे 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ह्यासाठी दिनांक 5 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर, 6 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. तसेच राज्यातील 3 हजार 80 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी देखील ह्याचवेळी मतदान होणार आहे. ( Maharashtra Garam Panchayat Election Voting For 2 thousand 359 Gram Panchayats on 5 November Read In Details )

ग्रामपंचायत निवडणूकांची संपूर्ण कार्यक्रमपत्रिका वाचा…

महाराष्ट्रातील एकूण 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची, 2 हजार 950 सदस्यपदा रिक्त जागांसाठी आणि 130 थेट सरपंच पदाच्या रिक्त जागांसाठीची निवडणूकीची घोषणा आज करण्यात आली. निवडणूक कार्यक्रम पत्रिकेनुसार दिनांक 5 नोव्हेंबर 2023 रोजी ह्या ठिकाणी आवश्यक असल्यास मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी ही घोषणा केली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रात आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. 6 ऑक्टोबर रोजी तहसीलदार याची नोटीस प्रसिद्ध करतील. निवडणूक कार्यक्रम पत्रिकेनुसार दिनांक 16 ते 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. त्यानंतर दिनांक 23 ऑक्टोबर 2023 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. ह्यातील पात्र नामनिर्देशनपत्रांपैकी अर्ज मागे घेण्याचा कालावधी हा दिनांक 25 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल आणि त्याच दिवशी 3 वाजल्यानंतर निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल.

दिनांक 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान होणार असून सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. तर मतमोजणी 06 नोव्हेंबर 2023 रोजी होईल. मात्र गडचिरोली आणि गोंदिया आदी नक्षलग्रस्त भागात सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मतदानाची वेळ असेल आणि तिथे 7 नोव्हेंबर 2023 रोजी मतमोजणी होईल. आणि 9 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी निकालांची अधिक सुचना प्रसिद्ध करतील, अशी माहिती पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ब्रेकिंग! महाराष्ट्रातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर, 5 नोव्हेंबरला होणार मतदान, वाचा सविस्तर
– ‘ज्येष्ठांचा आदर करूया, अनुभवाचा सन्मान ठेवूया’ । Vadgaon Maval News
– ‘पावसाची संततधार, दाट धुके, गडद अंधार आणि शेवाळलेल्या पायवाटा… अशा सर्व अडचणींवर मात करुन 6 जीव वाचवले’


Previous Post

महाराष्ट्रातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर! 5 नोव्हेंबरला होणार मतदान, वाचा सविस्तर

Next Post

तिकोणा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी स्वप्नील तुपे यांची बहुमताने निवड । Gram Panchayat Election

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Tikona-Gram-Panchayat-Maval

तिकोणा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी स्वप्नील तुपे यांची बहुमताने निवड । Gram Panchayat Election

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

government sudden increase in gas cylinder prices is unfair Maval Taluka Congress statement

सरकारने गॅस सिलिंडरची अचानक केलेली दरवाढ अन्यायकारक ; मावळ तालुका काँग्रेसचे निवदेन

March 12, 2026
MLA Sunil Shelke attention in session regarding issues in Dehuroad Cantonment area

रेडझोनचा प्रश्न, शिक्षण – आरोग्य – पाण्याची समस्या ; देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीतील प्रश्नांबाबत आमदार सुनील शेळके यांची अधिवेशनात लक्षवेधी

March 12, 2026
Agriculture Minister Dattatreya Bharane

खत विक्रीत अनियमितता आढळल्यास दोषी विक्रेत्यांचे परवाने सहा महिन्यांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेणार – कृषी मंत्री

March 12, 2026
Katkari community gets benefit of Rs 2 lakh 39 thousand from government for building house with toilet

शौचालय सहीत घरकुल बांधणीसाठी कातकरी समाजाला सरकारकडून मिळतो २ लाख ३९ हजार रुपयांचा लाभ

March 12, 2026
Renovation of classrooms at New English School in Vadgaon with Rs 31 lakh CSR fund from Astemo Fi Company

ॲस्टेमो फाय कंपनीच्या ३१ लाख सीएसआर निधीतून वडगावमधील न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या वर्गखोल्यांचे नूतनीकरण

March 11, 2026
Hope for the Children Foundation honors accomplished women in social and administrative fields in Maval

‘होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन’कडून मावळातील सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

March 11, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.