पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या विविध योजनांसाठी पशुपालक, शेतकरी बांधव, सुशिक्षीत बेरोजगार युवक, युवती व महिलांनी 19 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे.
नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत दुधाळ गाई-म्हशींचे गट वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप करणे, 1 हजार मांसल कुक्कुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, 100 कुक्कुट पिलांचे वाटप व 25+3 तलंगा गट वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन 2022-23 या वर्षात राबविली जाणार आहे. ( Maharashtra Government Animal Husbandry Department Appeals To Apply Online For Various Schemes )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
इच्छुकांनी https://ah.mahabms.com/webui/registration या संकेतस्थळावर किंवा एएच.एमएएचएबीएमएस मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे अर्ज करावा. अर्ज करतांना दुग्धालय, कुक्कटपालन किंवा शेळीपालन यापैकी स्वंतत्रतणे निवड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्विकारले जाणार आहे. अर्जदारांनी एखाद्या योजनेकरीता एकदा अर्ज केल्यानंतर दरवर्षी पुन्हा अर्ज करु नये. सदरचे अर्ज सन 2025-26 वर्षापर्यंत वैध राहण्यासाठी प्रतिक्षायादी तयार करण्यात येणार आहे. ( Maharashtra Government Animal Husbandry Department Appeals To Apply Online For Various Schemes )
योजनांची संपूर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पद्धती याबाबतचा संपूर्ण तपशील या संकेतस्थळावर तसेच मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे. या संगणक प्रणालीमध्ये अर्ज भरणे अत्यंत सुलभ करण्यात आले असल्यामुळे पशुपालकांनी अर्ज भरण्याकरिता मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करावा. अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत अर्ज केल्यानंतर आपला मोबाईल क्रमांक बदलणार नाही याची दक्षता घ्यावी.
अधिक माहितीसाठी 1962 किंवा 1800-233-0418 या टोल फ्री क्रमांकावर किंवा तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा उपआयुक्त कार्यालय, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी केले आहे.
अधिक वाचा –
– इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरिता आवेदनपत्र भरण्यासाठी डिसेंबरच्या ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ
– गोडुंब्रेमध्ये रानमांजरीच्या पिल्लांना जीवदान; वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी घडवली आई आणि पिल्लांची भेट