आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत राज्याचा गौरव वाढवणाऱ्या पैलवानांच्या मानधनात भरीव वाढ करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी केले. पुण्यातील स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडा नगरीत आयोजित 65व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2022-23 च्या पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते. फडणवीस यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र केसरी’ विजेता पैलवान शिवराज राक्षे याला मानाची गदा प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाला क्रीडा मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार ब्रिजभुषण शरण सिंह, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, खासदार श्रीरंग बारणे, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, हिंदकेसरी पै.अभिजीत कटके आदी उपस्थित आदी उपस्थित होते. ( Maharashtra Kesari 2022-2023 Pune Increase In Salary Of Wrestlers Devendra Fadnavis Announcement )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सामान्य घरातील युवक कुस्ती खेळतात. ते चांगली मेहनत करतात आणि त्यांना तेवढाच चांगला खुराकही लागतो. अशा खेळाडुंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि मदत करण्यासाठी ऑलिम्पिक स्तरावर यशस्वी राज्यातील मल्लांना 6 हजार ऐवजी 20 हजार रुपये मानधन देण्यात येईल. हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, रुस्तम-ए-हिंद विजेत्या मल्लांचे मानधन 4 हजारावरून 15 हजार रुपये, अर्जुन पुरस्कार विजेत्यांना 6 हजार ऐवजी 20 हजार रुपये, वयोवृद्ध खेळाडूंना अडीच हजार ऐवजी साडेसात हजार रुपये मानधन देण्यात येईल. मागील काळात तीन खेळाडूंना थेट पोलीस उपअधीक्षक पदावर नोकरीची संधी दिली, तशी संधी देण्याचे काम यापुढेही निश्चितपणे करण्यात येईल.
अंतिम फेरीचा सामना खेळला जाण्याआधी प्रचंड संख्येने जमलेल्या प्रेक्षकांशी संवाद साधला.
????♂️खाशबा जाधव यांनी देशाला पाहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिले तशी कामगिरी नंतर कुस्तीत कोणी केली नाही. महाराष्ट्र मागे का राहिला याचा विचार आपल्याला करावा लागेल.#MaharashtraKesari pic.twitter.com/nY69DVlC6r
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) January 14, 2023
डोळ्यांचे पारणे फेडणारी स्पर्धा संस्कृती प्रतिष्ठानने आयोजित केल्याबद्दल कौतुक करून क्रीडामंत्री महाजन म्हणाले, कुस्ती हा खेळ मेहनतीचा आणि बुद्धी चातुर्याचा आहे. पैलवानांना खूप कष्ट करावे लागते. आयुष्यभर कष्ट करून देशाला नाव मिळवून देणाऱ्या पैलवानांना तुलनेत त्यांना मिळणारे मानधन कमी आहे. या मानधनात भरीव वाढ करून पैलवानांचा सन्मान केला जाईल. शासनाने आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक पटकावणाऱ्या खेळाडूंना देण्यात येणाऱ्या रकमेत 10 लाखावरून 50 लाखापर्यंत वाढ करण्यात आली आहे. पैलवानांचाही सन्मान करण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! शिवराज राक्षे बनला 46वा महाराष्ट्र केसरी, महेंद्र गायकवाडला चीतपट करत पटकावली मानाची गदा
– देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड भागातील विकासकामांचा आमदार शेळकेंकडून आढावा; किन्हई, चिंचोलीचा पाणीप्रश्न सोडवण्याचे आश्वासन
– देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड भागातील विकासकामांचा आमदार शेळकेंकडून आढावा; किन्हई, चिंचोलीचा पाणीप्रश्न सोडवण्याचे आश्वासन