कुस्ती महर्षी स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडा नगरी, पुणे येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2022-2023 पार पडली. शनिवार (14 जानेवारी) रोजी या स्पर्धेची अंतिम लढत गादी विभागातील विजेता शिवराज राक्षे आणि माती विभागातील विजेता महेंद्र गायकवाड यांच्यात झाली.
प्रेक्षकांची खचाखच भरलेल्या क्रीडांगणात अत्यंत चुरशीच्या झालेल्या किताबी लढतीत शिवराज राक्षे याने महेंद्र गायकवाड याला चीतपट करत महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली. शिवराज राक्षेच्या रुपाने कुस्ती क्षेत्राला 46 वा महाराष्ट्र केसरी मिळालाय. ( Maharashtra Kesari 2023 Pune Shivraj Rakshe Win Tital In Final Mahendra Gaikwad Defeated )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
शिवराज राक्षे हा मुळ पुणे जिल्ह्यातीलच राजगुरुनगर येथील पैलवान असून काका पवार यांच्या तालमीत तो सराव करतो. तर उपमहाराष्ट्र केसरी बनलेला महेंद्र गायकवाड हा सोलापूर जिल्ह्यातील पैलवान आहे. महाराष्ट्र केसरीची शेवटची लढत पाहण्यासाठी क्रीडांगण अक्षरशः खचाखच भरलेलं होतं. काही मिनिटात शिवराजने महेंद्रला आस्मान दाखवले आणि 46 वा महाराष्ट्र केसरी बनला.
अधिक वाचा –
– ग्रामपंचायत लढवली ना? मग हिशोब सादर करा, 20 जानेवारीपर्यंत हिशोब सादर न केल्यास उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई होणार
– प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी ई-केवायसी प्रमाणिकरण करण्याचे आवाहन