व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, March 25, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महाराष्ट्र केसरी निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत संकेत चव्हाण, प्रसाद सस्ते विजयी

पुनावळेत रंगलेल्या स्पर्धेस कुस्ती शौकीनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 26, 2022
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, शहर
wrestling

Photo : Swapnil Hajare


पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघ आयोजित व वस्ताद आनंदराव बाजीराव बोरगे पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित महाराष्ट्र केसरी कुस्ती निवड स्पर्धेत खुला गट माती विभागात संकेत चव्हाण (निगडी) याने प्रतिस्पर्धी समाधान दगडे याचा दुहेरी डाव टाकत पराभव करून तर गादी विभागात प्रसाद सस्ते (मोशी) याने शेखर शिंदे याचावर मात करून विजय मिळवला. ( Maharashtra Kesari Wrestling Selection Competition Pimpri Chinchwad )

पुनावळे येथील वै.ह.भ.प. गणपत दामोदर रानवडे गुरुजी क्रीडांगणावर स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी माजी खासदार विदुराजी तथा नानासाहेब विठोबा नवले, पिंपरी चिंचवड शहर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे, उपाध्यक्ष विशाल कलाटे, हिंद केसरी अमोल बराटे, भारत केसरी विजय गावडे, विजय बराटे, खजिनदार दिलीप बालवडकर, खंडू वाळुंज, शंकर कंधारे, युवा महाराष्ट्र केसरी किशोर नखाते, मुंबई महापौर केसरी अजय लांडगे, राष्ट्रीय कुस्तीगीर अभिषेक फुगे यांच्या हस्ते आखाडा पूजन करण्यात आले. यानंतर हनुमंत गावडे, पै. रत्नेश बोरगे, श्रीधर वाल्हेकर, नाना काटे, वस्ताद सुरेश चव्हाण, विशाल आप्पा कलाटे आदी मान्यवरांच्या हस्ते वस्ताद ताराचंद भाऊसाहेब कलापुरे यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

पै. रत्नेश बोरगे, माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, नाना काटे, मयूर कलाटे, शेखर ओव्हाळ तसेच नवनाथ नढे, पै. संतोष माचुत्रे, विजय बराटे, पै. खंडू वाळुंज, राहुल काटे, विजय दर्शले, किरण बोरगे, बाळासाहेब ढवळे, गुलाब जाधव, रोहिदास बोरगे आदींच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल खालील प्रमाणे –

गादी विभाग कुमार गट – वजन गट ४५ कि. ओम नखाते (वि.) – सारंग बोराडे, ४८ कि. सोहम साळुंखे (वि) – भैरव नखाते, ५१ कि. ओंकार सुतार (वि) – साजिद मुलानी, ५५ कि. श्याम कदम (वि) – वेदांत जाधव, ६० कि. अजिंक्य माचुत्रे (वि) – चेतन हिप्परकर, ६५ कि. कुणाल कस्पटे (वि) – नकुल भालसिंग, ७१ कि. साहिल गायकवाड (वि) – विश्वजीत कोंडे, ८० कि. साहिल नखाते (वि) – कौस्तुभ जगताप, ९२ कि. पृथ्वीराज नढे (वि) – स्वराज काळभोर, १०० कि. शंतनु भोजने (वि) – गौरव वाघेरे; खुला गट गादी विभाग – ५७ किलो श्री जाधव (वि) – रुद्र वाळुंजकर, ६१ किलो योगेश्वर तापकीर (वि) – साहिल फुगे, ६५ किलो महेश जाधव (वि) – केदार लांडगे, ७० किलो वरूण कांचन (वि) – स्वप्निल सकुंडे, ७४ किलो परशुराम कॅम्प (वि) – अर्जुन कापसे, ७९ किलो सौरभ कामथे (वि) – विशाल कोळी, ८६ किलो पवन माने (वि) – सौरभ शिंगाडे, ९२ किलो सौरव जाधव (वि) – निरंजन बालवडकर, ९७ किलो अजिंक्य कुदळे (वि) – शुभम गवळी, ८६ ते १२५ किलो महाराष्ट्र केसरी गट प्रसाद सस्ते (वि) – शेखर शिंदे;

माती विभाग ५७ किलो – ऋतिक नखाते (वि) – सुनील चव्हाण, ६१ किलो संकेत माने (वि) – विनायक नाईक, ६५ किलो जय वाळके (वि) – यश सहाणे, ७० किलो अनिकेत लांडे (वि) – हर्षद पालवे, ७४ किलो जतीन कांबळे (वि) – शुभम घाडगे, ७९ किलो रवींद्र गोरड (वि) – अजिंक्य सांडभोर, ८६ किलो शेखर लोखंडे (वि) – सुरज देवकर, ९२ कि. कानिफनाथ काटे (वि) – वैभव कांचन, ९७ कि. संकेत घाडगे (वि) – शिवतेज शितोळे, १०० कि. संकेत चव्हाण (वि) – समाधान दगडे.

पंच म्हणून विजय कुटे, बाळासाहेब काळजे, सचिन खांदवे, निलेश मारणे, विक्रम पवळे, पप्पू काळेकर, संजय दाभाडे, ज्ञानेश्वरी लोखंडे, अमित म्हस्के, भानुदास घारे, वाबळे सर यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन बाबाजी निम्हण, सुरेश रानवडे, राहुल काटे यांनी तर आभार संतोष माचुत्रे यांनी मानले. स्पर्धेचे आयोजन पै. रत्नेशदादा बोरगे स्पोर्ट्स फाउंडेशनने केले होते. स्पर्धेस पंचक्रोशीतील कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा – 

– बेकायदा वाळू उपसा केल्याप्रकरणी इंदोरीतील दोन जणांना अटक, पोकलेन-ट्रॅक्टर जप्त
– डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे समाजोपयोगी उपक्रमातील योगदान गौरवास्पद ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


Previous Post

बेकायदा वाळू उपसा केल्याप्रकरणी इंदोरीतील दोन जणांना अटक, पोकलेन-ट्रॅक्टर जप्त

Next Post

आता घरबसल्या आणि मोबाईलवर मिळवा ग्रामपंचायतींचे दाखले, जाणून घ्या

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Gram-Panchayat-Certificate

आता घरबसल्या आणि मोबाईलवर मिळवा ग्रामपंचायतींचे दाखले, जाणून घ्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vadgaon Maval Police Station

मोठी बातमी ! वडगाव मावळ आणि कामशेत पोलीस ठाण्याचे PI बदलले, पाहा कोण आहेत नवीन पोलीस निरिक्षक

March 25, 2026
School Education Minister Dada Bhuse

‘आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांकडून साहित्याच्या नावाखाली पैसे घेता येणार नाही ; शाळांची प्रलंबित शुल्क प्रतिपूर्ती टप्प्याटप्प्याने करण्यात येईल’

March 25, 2026
new Rajmata Jijau bus service in ST Corporation fleet was inaugurated by CM and both Deputy Chief Ministers

‘राजमाता जिजाऊ’ : एसटी महामंडळाच्या ताफ्यातील नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बस सेवेचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

March 25, 2026
Approval for Talegaon to Chakan 4-lane elevated highway Decision taken meeting held in the presence of CM Fadanvis

मोठी बातमी ! तळेगाव ते चाकण ४ पदरी उन्नत महामार्गास मान्यता ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय

March 25, 2026
Prohibitory orders imposed in backdrop of Chaitri Yatra festival of Ekvira Devi Karla

Karla Ekvira Devi Yatra : आई एकविरा देवीच्या चैत्री यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू – वाचा नियमावली

March 24, 2026
Crime-financial-fraud

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली तळेगावमधील एकाची ११ लाखांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक

March 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.