व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, June 27, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महत्वाची बातमी! 2 हजार 70 कृषि सेवकांची पदभरती लवकरच – कृषि आयुक्त

कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त गट-क मधील विविध संवर्गातील सरळसेवा पदभरती बाबत प्रक्रिया सुरु झाली असून त्याची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
June 26, 2023
in महाराष्ट्र, पुणे, शहर
Krishi-Sevak-Recruitment

file image


कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त कृषि सेवक पदाच्या सरळसेवेच्या कोट्यातील २ हजार ५८८ रिक्त पदे विचारात घेता याच्या ८० टक्के म्हणजे २ हजार ७० पदांच्या भरतीसाठी प्रस्ताव शासनाकडे देण्यात आला असून शासनाची मान्यता प्राप्त होताच जाहिरात व पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती राज्याचे कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली आहे.

Novel NIBR Ads

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त गट-क मधील विविध संवर्गातील सरळसेवा पदभरती बाबत प्रक्रिया सुरु झाली असून त्याची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच पेसा क्षेत्रातील पदे निश्चित करण्याची कार्यवाही देखील अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती चव्हाण यांनी पुढे दिली. ( Maharashtra Krishi Sevak Recruitment 2023 )

कृषि विभागाचा सुधारित आकृतीबंध अद्याप अंतिम झाला नसल्यामूळे शासन निर्णयातील तरतूदीनुसार वाहनचालक व गट-ड संवर्गातील पदे वगळून इतर सरळसेवा कोट्यातील रिक्त पदांच्या ८० टक्के मर्यादीत पदभरती करण्यात येणार आहे. गट- क संवर्गातील सरळसेवा पदभरती आय. बी. पी. एस. या कंपनीमार्फत राबविण्यास शासन मान्यता मिळाली आहे. या संस्थेसोबत सामंजस्य करार देखील करण्यात आला आहे. त्यानुसार वरिष्ठ लिपिक, सहायक अधिक्षक, लघुलेखक ( निम्नश्रेणी) व लघुलेखक (उच्चश्रेणी) या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

पेसा क्षेत्रातील पदे भरणार –

Novel NIBR Ads

राज्यपाल महोदयांच्या २९ ऑगस्ट २०१९ च्या अधिसूचनेनुसार अनूसुचित / आदिवासी क्षेत्रातील (पेसा) १७ संवर्गातील सरळसेवेची पदे भरणेबाबत कळविण्यात आले आहे. त्यामध्ये कृषि सहायक संवर्गाचा समावेश आहे. शासन निर्णयानुसार विभागीय कृषि सहसंचालक ठाणे, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर व लातूर या विभागातील पेसा क्षेत्रातील मुख्यालय निश्चिती व पदसंख्या निश्चित करण्याबाबतच्या प्रस्तावास प्रशासकीय विभागाची मान्यता प्राप्त करुन घेणेबाबतची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे कृषी सेवक पदांसाठी जाहिरात देणे शक्य झालेले नाही, मात्र मान्यता मिळताच भरती संदर्भातील पुढील कार्यवाही केली जाईल, असे चव्हाण यांनी सांगितले.

अधिक वाचा –
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संवेदनशीलपणा !!
– ‘सर्व्हर डाऊन’मुळे मावळ तहसील कार्यालयाकडून दाखल्यांची दिरंगाई; हेलपाटे मारुन विद्यार्थी मेटाकुटीला


dainik maval jahirat

Previous Post

खंडाळा टँकर अपघात : मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवून देण्यासाठी बाळा भेगडेंनी घेतली वरे-पोशिरे कुटुंबीयांची भेट

Next Post

मोठी बातमी! लोणावळा रेल्वे स्थानकावर इंजिनिअरिंग ब्लॉक, दुपारच्या सत्रातील ‘या’ लोकल रद्द

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Railway-Track

मोठी बातमी! लोणावळा रेल्वे स्थानकावर इंजिनिअरिंग ब्लॉक, दुपारच्या सत्रातील 'या' लोकल रद्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Approval granted for permanent pictorial postal cancellation mark for Shrimant Mahadji Shinde Memorial Vadgaon Maval

वडगावच्या ऐतिहासिक वारशाचा राष्ट्रीय सन्मान ! श्रीमंत महादजी शिंदे स्मारकास कायमस्वरूपी चित्रमय टपाल शिक्क्यास मान्यता

June 27, 2026
Cancel the Pavana closed water channel project permanently

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाबाबत ३ जुलैला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक

June 27, 2026
MNS submits memorandum to Public Works Department regarding incomplete work on Karla Phata–Malavli road

कार्ला फाटा ते मळवली रस्त्याच्या अर्धवट कामासंदर्भात ‘मनसे’चे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन; आंदोलनाचा इशारा

June 26, 2026
Issue of traffic congestion at weekly market in Vadgaon Maval comes to fore

वडगाव मावळ येथील आठवडे बाजारातील वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर

June 26, 2026
Complete roadworks before the Ashadhi Wari MLA Sunil Shelke demands during monsoon session

आषाढी वारीपूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करा ; आमदार सुनील शेळके यांची पावसाळी अधिवेशनात मागणी

June 25, 2026
Railway-Track

दापोडी, देहूरोड, मळवली स्थानकांवर ‘लूप लाइन’ टाकण्याचा निर्णय; मध्य रेल्वे प्रशासनाचा लाखो प्रवाशांना दिलासा

June 25, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.