व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 19, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सावित्रीच्या लेकींनी घडवला इतिहास! दारुंब्रे शाळेचे नाव जिल्ह्यात गाजवले, आई-वडील अन् शिक्षकांच्या आनंदाला उधाण

ह्या यशामुळे तालुक्यात नवा इतिहास घडवणारी शाळा म्हणून दारुंब्रे शाळेचा नावलौकिक झाला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
July 25, 2023
in लोकल
Maharashtra-State-Examination-Council

Photo Courtesy : Vikas Raskar


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मावळ तालुक्यातील ( Maval Taluka ) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दारुंब्रे येथील दोन विद्यार्थीनींचा जिल्हा गुणवत्ता यादीत समावेश झाला आहे. दोन्ही विद्यार्थीनींच्या ह्या यशाबद्दल त्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षक यांचे सध्या सर्वच स्तरावरून अभिनंदन होत असून कौतुकाचा वर्षाव होतो आहे.

ह्या यशामुळे तालुक्यात नवा इतिहास घडवणारी शाळा म्हणून दारुंब्रे शाळेचा नावलौकिक झाला आहे. दारुंब्रे शाळेतल्या दोन्ही विद्यार्थीनींनी स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर हे उज्वल यश संपादित केले आहे. तसेच शाळेतील मार्गदर्शक शिक्षक वर्ग यांचाही तितकाच मोलाचा वाटा आहे. खास बाब म्हणजे प्रथम प्रयत्नातच शाळेतील 25 विद्यार्थ्यांपैकी 17 विद्यार्थी पास होऊन दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत आलेत, तर 200 गुणांपेक्षा अधिक असणारे 10 विद्यार्थी आहेत. ( Maharashtra State Examination Council Final Result Darumbare ZP School 2 Students Included In District Merit List )

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दारुंब्रे येथील दोन विद्यार्थीनींचा समावेश जिल्हा गुणवत्ता यादीत आहे, 1) कु. श्रद्धा रामदास सोरटे (गुण 254) केंद्रात – प्रथम, तालुकास्तर – आठवा आणि 2) कु. श्रावणी संतोष जाधव (गुण 236) या दोन्ही विद्यार्थीनींनी शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष प्राविण्य संपादन केलेले आहे.

हेही वाचा – व्वाह पोराहो…शाब्बास!! शिष्यवृत्ती परीक्षेच्या जिल्हा गुणवत्ता यादीत भोयरे शाळेतील तीन विद्यार्थ्यांचा समावेश

दारूंब्रे शाळेचे वैशिष्ट्य…

शाळेतील मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती सुजाता सुदाम बनकर यांनी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी म्हणून इयत्ता चौथीपासूनच विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय मंथन स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली होती. ज्यात एका विद्यार्थीनीने तालुका स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला होता. श्रीमती सुजाता बनकर यांनी मार्गदर्शनात सातत्य ठेवून विविध प्रकाशनाचे पुस्तकांचा वापर करून, 65 ते 70 सराव प्रश्नपत्रिका सोडवून सराव करुन घेतला. तसेच अधिकच्या तासाचे आयोजन करून बाह्य मार्गदर्शक तज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करुन दिले.

वर्षभर अध्यापन करत असताना पंचायत समिती मावळ यांची गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळूज यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रेरणा दिली. या शिष्यवृत्ती यशामध्ये माजी केंद्रप्रमुख संतोष कांबळे, मुख्याध्यापक गौतम चव्हाण, प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शाळा व्यवस्थापन समिती व पालक यांचे सहकार्य लाभले.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –

– खासदार श्रीरंग बारणे, अभिनेत्री साक्षी गांधी यांच्या हस्ते दहावी – बारावीतील 700 गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव । Maval Lok Sabha
– एकाच महिन्यात रस्त्यांची चाळण, लोणावळ्यात मनसे आणि भाजपचा मोर्चा, आंदोलनासाठी निवडली हटके स्टाईल


dainik maval jahirat

Previous Post

पाश्चात्य संस्कृतीतील फ्री रिलेशनशीपच्या प्रभावाने देशातील तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे – उच्च न्यायालय

Next Post

अधिवेशनात घुमला मावळचा आव्वाज..! तालुक्यातील विविध प्रश्नांकडे आमदार शेळकेंनी वेधले सभागृहाचे लक्ष

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Sunil-Shelke-News

अधिवेशनात घुमला मावळचा आव्वाज..! तालुक्यातील विविध प्रश्नांकडे आमदार शेळकेंनी वेधले सभागृहाचे लक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Agony even after death corpse suffers indignity due to lack of cremation ground in Maval Ardav village

मरणानंतरही नशिबी यातनाच ; मावळच्या आर्डव गावात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड

July 18, 2026
non-venomous Gajara snake Indian Smooth Snake considered extremely rare found at Kanhe Maval

मावळमधील कान्हे येथे आढळला अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा बिनविषारी गजरा साप (इंडियन स्मूथ स्नेक)

July 17, 2026
Work begins on Namo Udyan in Talegaon Dabhade groundbreaking ceremony in presence MLA Sunil Shelke

तळेगावच्या पंचवटी कॉलनीत ‘नमो उद्यान’ साकारण्यास प्रारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

July 17, 2026
Paying tribute at memorial pillar on occasion death anniversary of late Umeshbhai Shetty Lonavala Shiv Sena

Lonavala : शिवसेना मावळ तालुका संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्तंभास अभिवादन

July 17, 2026
Groundbreaking ceremony for three road projectsincluding Talegaon-Chakan-Shikrapur elevated highway

मावळच्या कनेक्टिव्हिटीला नवी गती ! तळेगाव–चाकण–शिक्रापूर उन्नत महामार्गासह तीन रस्ते प्रकल्पांचे शनिवारी भूमिपूजन

July 17, 2026
order imposing Section 163 in Lonavala rural area has been revoked all tourist spots are now open to visitors

मोठी बातमी! लोणावळा ग्रामीण परिसरातील कलम १६३ लागू केलेला आदेश रद्द; सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी विनाअट खुली

July 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.