महाराष्ट्रातील कोट्यवधी जनतेला शॉक देणारी ही बातमी आहे. महावितरण कंपनीच्या खासगीकरणाविरोधात कर्मचाऱ्यांनी उद्यापासून 3 दिवसांचा संप पुकारला आहे. महाराष्ट्रातील जवळपास 86000 वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी आणि 42 हजार कंत्राटी कामगार आज रात्री 12 वाजेपासून 72 तासाचा संपावर जाणार आहेत. ( mahavitaran employees called 3 day strike today night against company privatization )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
दिनांक 2 जानेवारी 2023 रोजी वीज कर्मचाऱ्यांच्या संघर्ष समितीने पुकारलेल्या आंदोलन आणि संपाबाबत महाराष्ट्र शासनाच्या प्रधान ऊर्जा सचिव व तिन्ही कंपन्यांचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तसेच इतर अधिकारी यांच्या बरोबर संघर्ष समितीमध्ये सहभागी 31 संघटनांची बैठक झाली. मात्र या बैठकीमध्ये ठोस असे आश्वासन न मिळाल्यामुळे वीज उद्योगातील कर्मचारी संघटनांच्या संघर्ष समितीने 3 जानेवारीच्या 12 वाजेपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
वीज कर्मचाऱ्यांची भूमिका नेमकी काय?
“संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व वीज कर्मचारी संपावर राहतील. हा संप तुम्हाला त्रास होईल अशा उद्देशाने बिलकुल नाही. आम्हाला काही मिळवायचे आहे असा सुद्धा या संपा मागे उद्देश नाही. पण फ्री सिम देऊन हळूहळू बीएसएनएल कंपनी जशी गिळंकृत केली तशी सार्वजनिक उद्योग महावितरण गिळंकृत करायला कोणी येत असेल तर त्याला हा विरोध होय. नक्कीच हे तीन दिवस त्रासदायक होतील. पण आम्ही दिलगीर आहोत. हा संप फक्त ग्राहकांकरिता आहे,” असे वीज कर्मचारी संघर्ष समितीकडून सांगण्यात आले आहे.
अधिक वाचा –
– तीर्थक्षेत्र देहूत विकास कामांचा धडाका; खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते भूमीपूजन, लोकार्पण
– आमदार लक्ष्मण जगताप यांना मावळ भाजपच्या वतीने पक्ष कार्यालयात आदरांजली । Lakshman Jagtap Passed Away