नाशिक जिल्ह्यात आज (सोमवार, 13 फेब्रुवारी) सकाळीच एक भीषण रेल्वे अपघात घडला. या अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. नाशिकच्या लासलगाव रेल्वे स्थानकालगत सोमवारी सकाळी ओव्हरहेड वायर दुरुस्त करणाऱ्या इंजिनने उडवल्याने 4 कर्मचाऱ्यांचा ( गँगमनचा ) मृत्यू झाला आहे. इंजिन चुकीच्या दिशेने गेल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर संतप्त रेल्वे कर्मचाऱ्यांनी काहीकाळ रेल रोको केला होता. ( Major Accident Four Railway Employees Died In An Engine Collision Near Lasalgaon Railway Station In Nashik )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
लासलगावकडून उगावकडे निघालेले वीज वाहिनी दुरुस्तीचे काम करणारे इंजिन चुकीच्या दिशेने गेल्याने हा अपघात घडला. इंजिनच्या धडकेत गँगमन संतोष केदारे (30), दिनेश दराडे (35), कृष्णा अहिरे (40) आणि संतोष शिरसाठ (38) यांचा मृत्यू झाला. सदर दुर्घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. संतप्त कर्मचाऱ्यांनी बराचवेळ रेल रोको आंदोलन केले. तब्बल 20 मिनिटे गोदावरी एक्स्प्रेस रोखून धरण्यात आली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी समजूत काढल्यानंतर कर्मचाऱ्यांनी माघार घेतली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ( Major Accident Four Railway Employees Died In An Engine Collision Near Lasalgaon Railway Station In Nashik )
अधिक वाचा –
– दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी! आता प्रश्नपत्रिका वाटल्यानंतर वर्गात आल्यास ‘नो एन्ट्री’
– राष्ट्रीय लोक अदालतीत 78 हजार प्रलंबित दावे निकाली, पुणे जिल्हा सलग नवव्यांदा राज्यात प्रथम