Dainik Maval News : मावळ तालुक्यातील लोणावळा शहर आणि परिसर, तसेच मावळचा ग्रामीण भाग हा पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांचे खास आकर्षण आहे. वर्षाविहार आणि पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांमुळे वाहतूककोंडी आणि अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.
दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने 31 ऑगस्टपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. तसेच ही वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आलीये. याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आदेश जारी केले आहेत.
1. भाजे गावाकडून येणारी वाहतूक मळवली-कार्ला गावाकडे जाण्यासाठी बंद करण्यात येत असून, त्याऐवजी पर्यायी मार्गाने भाजे येथून पाटण पुलावरून डावीकडे देवले औंढे पुलाहून पुढे सेवारस्त्याने कुसगाव- लोणावळा येथून जुना महामार्ग व एक्सप्रेस-वेकडे जातील.
2. औंढे-देवले रोडने मळवली, भाजे येथे येणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्याऐवजी औंढे-लोणावळा-कर्ला फाटा-मळवली- भाजे अशी पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू राहील.
3. मळवली व सदापूर येथून कार्ला येथे येणारी वाहतूक बंद करण्यात येत आहे. त्याऐवजी पर्यायी मार्गाने वाहने मळवली- सदापूर-वाकसई फाट्यावरून जुन्या महामार्गाकडे जातील.
4. वाकसई फाटा येथून सदापूर मळवलीकडे जाणारी वाहने बंद करण्यात आली आहेत. त्याऐवजी पर्यायी मार्गाने कार्ला फाटा येथून सरळ पुढे मळवली, पाटण, माजे अशी वाहने जातील.
5. भाजे ते लोहगड या मार्गावरील वाहतूक एकेरी करण्यात आली आहे. लोहगडाकडे जाण्यासाठी भाजे येथून पर्यायी मार्ग असेल.
6. लोहगड येथून पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनांनी लोहगड- दुधिवरे खिंड- औंढोली- औंढे यामार्गे पुणे-मुंबई व मुंबई-पुणे एक्सप्रेस वे या मार्गाचा किंवा लोहगड-दुधिवरे – खिंड- पवनानगर यामार्गे नवीन पुणे-मुंबई व मुंबई-पुणे महामार्गाचा वापर करावा.
7. लोहगड येथून मुंबई किंवा पुणेकडे जाणारी दोनचाकी व तीनचाकी वाहनांनी लोहगड-दुधिवरे – खिंड- औढोली- आढे- औंढे पुलावरून कुसगाव-लोणावळा येथून जुना मुंबई- पुणे व पुणे-मुंबई या मार्गांचा वापर करावा.
8. जुना मुंबई-पुणे व पुणे-मुंबई रोडवरील कार्ला फाटा ते वेहेरगाव या मार्गावर अवजड वाहनांना प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. तसेच वाहतूक बदलाबाबतचे आदेश हे स्थानिक रहिवाशांना लागू नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– किल्ले लोहगडाकडे जाणारा रस्ता अरूंद आणि धोकादायक ! तातडीने रुंदीकरण, डागडुजी करण्याची मागणी । Lohgad Fort
– मोठी बातमी ! लोणावळासह मावळ परिसरात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू, वाचा नियमावली
– शेतजमिनीची प्रकरणे मार्गी लावण्याकरीता लवकरच लोकअदालतीचे आयोजन ; काय आहे संकल्पना, वाचा सविस्तर

