शनिवारी (दि. 13 मे) सीबीएसई बोर्डाने दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला. गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी निकालाची वाट पाहत होते, अखेर शनिवारी निकाल लागला. यंदा CBSE बोर्ड परीक्षेत 93.60 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. मावळ तालुक्यात तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित मामासाहेब खांडगे इंग्लिश मीडियम स्कूलचा शंभर टक्के निकाल लागला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मागील 6 वर्षांपासून मामासाहेब खांडगे इंग्लिश मीडियम स्कूलचा शंभर टक्के निकाल लागत असून यंदाही ही परंपरा कायम राहिली. मुख्याध्यापिका प्रणाली गुरव यांनी ही माहिती दिली. यंदा परीक्षेला एकूण 33 विद्यार्थी बसले होते. त्यात सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तम गुणांसह उत्तीर्ण झालेत. विद्यार्थ्यांनी उज्वल यशासह शाळेच्या निकालाचीही परंपरा कायम राखली. ( Mamasaheb Khandge English Medium School hundred percent result in CBSE board exam Talegaon Maval )
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, उपाध्यक्ष व शाळेचे अध्यक्ष गणेश खांडगे, संस्थेचे सचिव संतोष खांडगे, सहसचिव नंदकुमार आदींनी शाळेतील अध्यापक, अध्यापिका, गुणवंत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे.
सार्थक भांडवलकर प्रथम –
यंदा दहावी परीक्षेच 94 टक्के गुण मिळवत . सार्थक दत्तात्रय भांडवलकर याने शाळेत प्रथम क्रमांक मिळवला आहे, तर कु. यश भीमराव साळवी याने 93.00 टक्के गुण मिळवित द्वितीय क्रमांक पटकावला आहे. कु. प्रियल सचिन जिंदाल हिला 91.00 टक्के गुण मिळाले असून ती तिसरी आली आहे.
अधिक वाचा –
– नागरिकांनो घराबाहेर बिलकूल पडू नका ! वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह कोसळतोय अवकाळी पाऊस । Maval News
– डेंग्यूला स्वतःपासून आणि कुटुंबापासून दूर हटविण्यासाठी ‘या’ उपाययोजना करा – आरोग्य विभागाचे आवाहन
– यशदा येथे विज्ञान आणि नैसर्गिक शेती या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन । Pune News