Dainik Maval News : पोलिसांना पिस्तूलाची माहिती दिल्याचा राग मनात धरून बांधकाम व्यावसायिकास दगड आणि लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आल्याची घटना वडगाव शहर हद्दीतील कातवी गावात घडली आहे. बेकायदेशीर पिस्तूलाची माहिती पोलिसांना दिल्यामुळे बांधकाम व्यावसायिकास जबरी मारहाण करण्यात आलीये.
ही घटना २३ जून रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास कातवी (ता. मावळ) येथे घडली असून विशाल माणिक चव्हाण (वय ४२, रा. कातवी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. अशोक रघुनाथ चव्हाण (वय ४९, बांधकाम व्यावसायिक, रा. कातवी) असे जखमी व्यक्तीचे नाव असून त्यांनी याबाबत तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडे बेकायदेशीर पिस्तूल असल्याची माहिती फिर्यादीने पोलिसांना दिली होती. त्यामुळे आरोपीने मनात राग ठेवून फिर्यादीस लाकडी दांडक्याने आणि दगडाने डोक्यात व हातावर मारहाण केली. तळेगाव एमआयडीसी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पवन मावळात पावसाचा जोर वाढला, पवनाधरण परिसरात 24 तासात 102 मि.मी. पाऊस, धरणात ‘इतका’ पाणीसाठा । Pavana Dam
– लोणावळा शहरात पावसाची जोरदार बॅटींग, 24 तासात तब्बल 171 मि.मी. पाऊस । Lonavala Rain Updates
– कार्यकर्ते हेच आमचे खरे बलस्थान, पुढील प्रत्येक निर्णय त्यांच्याच सल्ल्याने घेणार – आमदार सुनील शेळके


