Dainik Maval News : आमदार सुनील शेळके यांच्या प्रेरणेतून आणि प्रशांत दादा भागवत युवा मंचाच्या वतीने मनोरंजन संध्या 2025 हा भव्य आणि उत्साहवर्धक कार्यक्रम राजपुरी येथे संपन्न झाला. ह्या कार्यक्रमाला महिला वर्गाचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. संपूर्ण गाव स्नेह, आनंद आणि ऐक्याच्या भावनेने या कार्यक्रमाला एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक – प्रियंका संदीप चव्हाण, द्वितीय क्रमांक – प्रियंका जगताप , तृतीय क्रमांक – सानिका आदिनाथ लंके यांना मिळाला. सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ, मनोरंजक स्पर्धा आणि हास्यविनोद यामुळे प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग हा या संध्याकाळीचा खरा ठेवा ठरला.
यावेळी नारायण शिंदे, प्रदीप बनसोडे, भानुदास दरेकर, बाबासाहेब घोजगे, भरत घोजगे, भगवान शिंदे, किसनराव शिंदे, संतोष वंजारी, बाबाजी शिंदे, आदिक शिंदे, छगन लंके, अंकुश वाघमारे, संदीप चव्हाण, मयूर शिंदे, राहुल लोंढे, पूनम सागर शिंदे, प्रिती सोमनाथ लंके, मयूरी पाटोरे, विद्या ठोमसे आदी मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम अधिकच भव्य झाला
राजपुरी येथील भैरवनाथ मंदिराच्या जिर्णोद्धार साठी 51 हजार देणगी देण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे प्रशांत दादा भागवत यांनी मावळातील महिलावर्ग, तरुणाई आणि ग्रामस्थांच्या मनात विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे. केवळ राजकारण नव्हे, तर सामाजिक व सांस्कृतिक जडणघडणीत सक्रिय सहभाग हेच त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य आहे.
‘मनोरंजनासोबत समाजजागृती’ या विचाराने प्रेरित होऊन घेतलेला हा कार्यक्रम प्रशांत दादांच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीचा ठसा उमटवणारा ठरला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत मतदारांसाठी प्रशांत दादा भागवत हेच खरे सक्षम व विश्वसनीय पर्याय असल्याचे या भव्य सोहळ्यातून अधोरेखित झाले असल्याची परिसरातील नागरिकांमध्ये चर्चा रंगू लागली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात हजार रुपयांची वाढ ; आता मिळणार ‘इतके’ पैसे
– वडगाव मावळ न्यायालयाच्या अत्याधुनिक इमारतीच्या कामास मंजूरी ; इमारत बांधण्यासाठी १०९ कोटी ८ लक्ष निधीस मान्यता
– मोठी बातमी ! पुणे ते लोणावळा दरम्यान तिसरी व चौथी उपनगरीय रेल्वे मार्गिका बांधण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता