मराठवाडा मित्र मंडळाचे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, पुणे यांचे 2022-23 या शैक्षणिक वर्षातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ-राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबीर 23 जानेवारी 2023 ते 29 जानेवारी 2023 या कालावधीत मौजे शिळींब (ता. मावळ जि. पुणे) येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात एकूण 25 एनएसएस स्वयंसेवक विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि 3 प्राध्यापक उपस्थित होते. ( Marathwada Mitra Mandal’s College of Architecture NSS camp Concluded At Shilimb Village Maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सदर शिबिरातील प्रमुख कामांमध्ये शिळींब गाव परिसराचा नकाशा तयार करणे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे रंगकाम आणि साफसफाई, बसण्याची जागा तयार करून गाव चौकाचे सुशोभीकरण, दुकानांचे आवार रंगवणे, हनुमान मंदिर परिसराची स्वच्छता, आभा कार्ड मोहीम आणि इतर उपक्रम केले होते. नियोजित उपक्रम हे विद्यार्थ्यांच्या स्थापत्यशास्त्राच्या इनपुटशी सुसंगत होते आणि नियमित एनएसएस विहित कामांसह काही बांधकाम उपक्रमही होते. याच बरोबर शिबिरामध्ये मतदार जनजागृती, स्वामी विवेकानंद आणि इतर विषयांवर ग्रामस्थांसाठी व्याख्यान आयोजित केले होते.
मराठवाडा मित्र मंडळ, पुणे अध्यक्ष शिवाजीराव गणगे सर, कार्याध्यक्ष बी.जी. जाधव सर आणि सर्व कार्यकारिणी सदस्यांनी शिबिरासाठी मोलाचे सहकार्य केले. मराठवाडा मित्र मंडळाच्या कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, पुणे याच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला पळसुले यांनी शिबिरासाठी सर्व विद्यार्थी स्वयंसेवकांना मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिले. प्रा. कीर्ती सागावकर (कार्यक्रम अधिकारी आणि एमएमसी ओए – एनएसएस), प्रा. शौनक नाईक (विद्यार्थी कल्याण अधिकारी) आणि प्रा. वैदेही साधविलकर यांनी संपूर्ण शिबिराचे यशस्वी आयोजन आणि सुत्रसंचालन केले होते.( Marathwada Mitra Mandal’s College of Architecture NSS camp Concluded At Shilimb Village Maval )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडेत ‘आरोग्य संपदा महाशिबीर’, तालुकावासियांनी आरोग्यसेवेचा लाभ घेण्याचे आमदार शेळकेंचे आवाहन
– मोठी बातमी! जवण-तुंग रोडवर अपघात, थेट शेतातील विहिरीत कोसळली कार