Dainik Maval News : परभणी येथे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात असलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान झाल्याची घटना मंगळवारी (दि.10 डिसेंबर) रोजी घडली होती. तसेच राज्यघटनेच्या अवमान प्रकरणी झालेल्या आंदोलनातील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेच्या निषेधार्थ तळेगाव दाभाडे येथे निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
तळेगाव शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने निषेध मोर्चाचे गुरुवारी (दि.19) आयोजन करण्यात आले होते. प्रज्ञादीप बुद्ध विहार, हरणेश्वर वाडी येथून मोर्चाची सुरुवात झाली. तळेगाव दाभाडे स्टेशन चौक, जिजामाता चौक, सुभाष चौक, तेली आळी येथून मारुती मंदिर चौकात मोर्चाची सांगता झाली. मारुती मंदिर चौकात झालेल्या निषेध सभेमध्ये परभणीतील घटनांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.
यावेळी किरण साळवे, प्रमोद काकडे, संदीप शिंदे, करुणा सरोदे, लता ओहाळ आदींनी मनोगत व्यक्त केले. शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नायब तहसीलदार रमेश तळेकर यांनी यावेळी आंदोलकांच्या मागणीचे निवेदन स्विकारले. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील ‘या’ महत्वाच्या चौकांमध्ये उड्डाणपूल उभारणे गरजेचे ; आमदार सुनिल शेळके यांची अधिवेशनात मागणी
– मोठी बातमी : पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला मिळणार गती । Pune – Lonavala Local
– मावळातील शेतकऱ्यांची भात भरडण्यासाठी लगबग ; इंद्रायणी तांदुळाला सर्वोत्तम दराची अपेक्षा । Maval News