समस्त हिंदू बांधव सामाजिक संस्थेने पुकारलेल्या लोहगड मुक्ती संग्राम आंदोलनाचे रविवारी (दिनांक 18 जून 2023) आयोजन केले गेले होते. सदर आंदोलन हे लोहगड वरील अनैतिहासिक वास्तू तसेच अनधिकृत बांधकाम ह्यांच्या विरोधात कड्क कारवाई व्हावी, तसेच गडमुक्त होऊन पूर्व स्वरूपात जतन व्हावा, ह्यासाठी आयोजित केले गेले होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सदर आंदोलनास समस्त हिंदू बांधव, सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रवींद्र पडवळ ह्यांनी मार्गदर्शन करून संबोधित केले. लोहगड वर असणारे अनधिकृत बांधकामे ह्यांची सर्व शहानिशा करून त्वरित काढून टाकण्यात यावी, ही ह्या आंदोलनाची मुख्य मागणी आहे. सदर मागणी विचारत घेण्यासाठी लोहगड किल्ल्याचे काम करण्यासाठीचे केंद्र शासनाचे पुरातत्त्व विभाग अधिकारी गजानन मंडागळे ह्यांनी पुरातत्त्व विभागाच्या वतीने जबाबदारी स्वीकारून समस्त हिंदू बांधव सामाजिक संस्थेच्या वतीने दिले गेलेलं निवेदन स्वीकारून सदर संस्थेस लिखित स्वरूपाचे वचन दिले आहे.
पुरातत्त्व खाते सदर किल्ल्याची पूर्णपणे पडताळणी करून जुने नकाशे उपलब्ध करून सदर कार्यवाही पुढे नेतील, असे लिखित आश्वासन दिले असून ह्या आंदोलनास गालबोट लागू नये म्हणून समस्त हिंदू बांधव सामाजिक संस्थे बरोबर लोणावळा ग्रामीण पोलीस प्रशासन ह्यांचे मोठे सकारात्मक सहकार्य लाभले. ( March of Hindu organizations to demand removal of encroachment on Lohgad fort )
सदर आंदोलनास अखंड महाराष्ट्रातील शिवभक्त जमा झाले होते आणि कार्य हे अत्यंत नियोजनपूर्वक व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले व कार्याची नवीन पद्धत समाजास मिळाली. सदर कार्यात समस्त हिंदू बांधव चे संस्थापक अध्यक्ष रवींद्र पडवळ, उपाध्यक्ष धनंजय पवार, सचिव राज तपसे, ऋतुजा माने, वैभव राऊत, निखिल मोरे, विशाल तावडे, मनोज किवळे, अक्षय आहेर, जय साबळे, शैलेश जगताप, सोनाली रानवडे, दिनेश ढगे, राज सोनावणे, तुषार यादव, प्रतीक गोसावी, श्रद्धा शिंदे तसेच भाजे गावचे सरपंच राजेश शेलार आणि भाजे गावचे सर्व ग्रामस्थ तसेच सूनीलजी गायकवाड, समस्त हिंदु बांधव लोणावळा विभाग, हिंदु समिती लोणावळा आदी उपस्थित होते.
त्याच प्रमाणे पोलीस प्रशासनातील आयपीएस अधिकारी सत्यसाई कार्तिक, किशोर धुमाळ, निलेश माने तसेच सर्व पोलीस बांधवांचे सहकार्य लाभले. ह्या सर्वांमध्ये मुंबई, गुजरात, नाशिक, कोल्हापूर, कर्नाटक, सांगली, लातूर, बुलढाणा, महाबळेश्वर, पुणे, अक्कलकोट, परभणी, नाशिक, जळगाव, ठाणे, धाराशिव येथून आलेल्या शिवभक्तांनी घोषणा देऊन भाजे व लोहगड परिसर दणाणून टाकला. सदर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
अधिक वाचा –
– गोमांस वाहतूकप्रकरणी दोनजण ताब्यात; पहाटेच्या सुमारास पोलीस आणि गोरक्षकांची संयुक्त कारवाई । वडगाव मावळ
– राजमाची येथील वरे कुटुंबीयांचे आमदार सुनिल शेळकेंकडून सांत्वन, शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन