पवना धरणग्रस्त संयुक्त संघटना आणि पवना धरणग्रस्त यांच्याकडून आज (मंगळवार, दिनांक 9 मे) रोजी सकाळी 10 वाजता प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. पवनानगर काले कॉलनी ते पवनाधरण बंधारा असा लाँग मार्च काढण्यात येणार आहे. अधिकाधिक नागरिकांनी या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन संयुक्त समितीकडून करण्यात आले आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
“पवना धरणग्रस्त संयुक्त संघटना व पवनाधरणग्रस्त यांच्या पुढाकारातून पवना धरणाच्या पायथ्याशी जन अंदोलन घेण्यात आले आहे. या अंदोलनात मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते बंधू भगिनींनी सहभागी व्हावे ही विनंती” असे निर्देश राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही देण्यात आले आहेत. ( march of Pavana Dam victims from Kale Colony to Pavana Dam on 9th May )
– पवना धरण ग्रस्तांचे या पुर्वी 340 खातेधारकांचे ज्या नियमाप्रमाणे / आदेशाप्रमाणे खातेवाईज प्रत्येकी 4 एकर प्रमाणे पुनर्वसन करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे उर्वरीत शिल्लक खातेदारांचे पुनर्वसन करण्यात यावे.
– पवना धरणग्रस्त युवकांना पिंपरी चिंचवड मनपामध्ये नोकरीसाठी प्राधान्य मिळावे या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी हे अंदोलन होत आहे.
अधिक वाचा –
– ‘वारसा स्वच्छतेचा, मावळा शिवरायांचा’ अभियानांतर्गत 10 मे रोजी टायगर पॉइंट, लायन पॉइंट भागात स्वच्छता मोहीम
– मावळमधील बेलज येथील जिल्हा परिषद शाळेच्या नूतन इमारतीचे आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते भूमिपूजन