मावळ तालुक्यातील बेलज येथील जिल्हा परिषद शाळेच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन समारंभ आज (सोमवार, दि. 8 मे) रोजी आमदार सुनिल शेळकेंसह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. केएसपीजी (KSPG) ऑटोमोटिव्ह इं.लि., रोटरी क्लब ऑफ निगडी यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे 1 कोटी 80 लक्ष रुपये सीएसआर ( CSR ) फंडातून ही नूतन इमारत उभारण्यात येणार आहे. शाळेच्या अद्ययावत इमारतीमध्ये वर्गखोल्या, वाचनालय, प्रयोगशाळा, कार्यालय इत्यादींचा समावेश असणार आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मावळ तालुक्यातील #बेलज येथील जिल्हा परिषद शाळेच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन समारंभ आज मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.KSPG ऑटोमोटिव्ह इं.लि., रोटरी क्लब ऑफ निगडी यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे 1 कोटी 80 लक्ष CSR फंडातून ही नूतन इमारत उभारण्यात येणार आहे. pic.twitter.com/7a1jwqb3VV
— Sunil Shelke (@shelkesunilanna) May 8, 2023
या भूमिपूजन समारंभ प्रसंगी आमदार शेळकेंसमवेत, KSPG कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर रतनकुमार मोहपात्रा, मनस्वी मोहपात्रा, विक्रम म्हस्के, रोटरी क्लब ऑफ निगडी अध्यक्षा प्रणिता अलूरकर, आर्किटेक्ट उषा रंगराजन, सरपंच सुवर्णा असवले, बाजार समिती संचालक शिवाजी असवले, भूषण असवले, मारुती असवले, अनिल असवले, ऋषीनाथ शिंदे, प्रिया मालपोटे, बाळासाहेब कोकाटे, अनिल मालपोटे, नारायण मालपोटे, अविनाश असवले, परशुराम मालपोटे, आशा मदगे, प्रतिक्षा जाधव, विजय काळभोर, अजिंक्य टिळे, शिक्षकवर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते. ( Bhoomipujan of new building of Zilla Parishad School at Belaj in Maval taluka by MLA Sunil Shelke )
अधिक वाचा –
– गौतमी पाटील आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल प्रकरण; एकाला जामीन मंजूर, ॲड सुरज शिंदे यांचा युक्तीवाद
– ‘द केरळा स्टोरी’ चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री करण्यात यावा, मावळ भाजपा विद्यार्थी आघाडीचे तहसीलदारांना निवेदन