Dainik Maval News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बंडखोर उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी सोमवारी (दि.28 ऑक्टोबर) जोरदार शक्तीप्रदर्शन करीत त्यांचा अपक्ष उमेवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी बापूसाहेब भेगडे यांनी माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे आणि रविंद्र भेगडे यांच्या समवेत वडगाव बाजारपेठेतून भव्य रॅली काढली.
मावळ विधानसभा मतदारसंघात बापूसाहेब भेगडे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपले नामनिर्देश पत्र दाखल केले. सोमवारी (दि.28) रोजी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत बापूसाहेब भेगडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज स्वीकारला, यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार विक्रम देशमुख हेही उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज दाखल करत असताना बापूसाहेब भेगडे यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष आणि भारतीय जनता पार्टी या चारही पक्षांचे तालुकाध्यक्ष उपस्थित होते. भाजपाचे तालुकाध्यक्ष यांनी महायुतीच्या विरोधात भूमिका घेत बापूसाहेब भेगडे यांना पाठींबा दिला आहे. यानिमित्ताने चार प्रमुख पक्षांची ताकद अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांच्या पाठीशी असल्याचे दिसले.
बापूसाहेब भेगडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, तेव्हा हजारोंचा जनसमुदाय वडगाव मावळ शहरात जमला होता. पंचायत समिती चौक वडगाव मावळ येथे भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बापूसाहेब भेगडे यांच्या सोबत तालुक्यातील भाजपाचे अनेक प्रमुख नेते, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, इतर काही मान्यवर.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘आम्ही पक्षाचा आदेश मानणार, महायुतीच्या उमेदवाराचे काम करणार’ ; तळेगाव भाजपा पदाधिकाऱ्यांचा सुनिल शेळकेंना पाठींबा
– मावळ विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत ‘या’ तीन उमेदवारांचे अर्ज दाखल । Maval Vidhan Sabha
– मावळात शरद पवारांचा अजितदादांना धक्का ! अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांचं काम करण्याचे पदाधिकाऱ्यांना आदेश