Dainik Maval News : विधानसभा निवडणूकांची घोषणा झाल्यापासून राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्यातही पुणे ग्रामीण मधील मावळ विधानसभा मतदारसंघात तर राजकीय नाट्याचा महाअंक सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. मावळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार सुनिल शेळके हे दुसऱ्यांदा निवडणूकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज आहे. तर दुसरीकडे आमदार शेळके यांच्या उमेदवारीला त्यांच्याच पक्षातील नेत्यांकडून आणि महायुतीतील घटकपक्षांच्या नेत्यांकडून विरोध होताना दिसत आहे.
मावळ तालुक्यात सध्या राजकीय टीका, प्रतिक्रिया यांच्या भडीमार सुरू असलेला दिसतोय. काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनी पत्रकार परिषद घेत उमेदवारीबद्दल भाष्य केले होते. त्यानंतर तालुक्यात चर्चांना उधाण आले होते. यात आता आमदार सुनिल शेळके यांनी माध्यमांशी बोलताना आपली स्पष्ट प्रतिक्रिया दिली आगे.
काही दिवसांपूर्वीच विधानसभेसाठी इच्छुक असलेला बापूसाहेब भेगडे यांनी पक्षाने देऊ केलेले महामंडळ नाकारले आणि उमेदवारीची तीव्र इच्छा प्रकट केली. ते म्हणाले की, ‘मला समजलं महामंडळाचा उपाध्यक्ष म्हणून मला स्थान दिले. परंतु ज्या कार्यकर्त्यांनी मागितलं त्यांना द्या. मला महामंडळ नको. मावळ विधानसभेची उमेदवारी मला मिळेल याची खात्री आहे. निकाल वेगळा लागला, तर माझे कार्यकर्ते एकत्र बसून यावर विचार करून निर्णय घेणार.’ अशी स्पष्ट भुमिका मांडताना बापूसाहेब भेगडेंनी यांनी जणू बंडखोरीचा इशारा दिला होता. त्यामुळे तालुक्यात अनेक उलट सुलट चर्चा सुरु झाल्या. याचदरम्यान आता आमदार सुनिल शेळके यांनीही आपली भुमिका मांडली आहे.
मावळ विधानसभेबाबत पक्षाकडून अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. या विधानसभेसाठी माझ्यासह इतर काही जण इच्छुक आहे. जोपर्यंत उमेदवारी जाहीर होत नाही, तोपर्यंत उमेदवारी मिळावी म्हणून मी कुणाच्या घरी जाणार नाही. तसेच मला उमेदवारी मिळावी म्हणून मी आग्रही नाही, शिवाय कोणाकडे शिफारस देखील करणार नाही, असे ठाम मत सुनिल शेळके यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे. सोबत सुनिल शेळके यांनी कुणाचे नाव जरी घेतले नसले तरी आपल्या पक्षातील काही पदाधिकाऱ्यांची कान उघडणी देखील केली आहे.
नेमके काय म्हणाले सुनिल शेळके ?
महायुतीचे नेते मावळच्या उमेदवारामागे ठाम राहतील. लोकसभा निवडणुकीत एकसंघ काम केले. त्यातून उमेदवाराला विजयी मताधिक्य मिळाले आहे. मावळ विधानसभा मतदारसंघात कुठला उमेदवार द्यायचा, हे अद्याप निश्चित झाले नाही. ही जागा राष्ट्रवादीला मिळावी म्हणून आम्ही आग्रही आहे. माझ्यासह इतर काही जण इच्छुक आहेत. यावर पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील. जोपर्यंत उमेदवारी जाहीर होत नाही. तोपर्यंत उमेदवारी मिळावी म्हणून मी कुणाच्या घरी जाणार नाही. मलाच उमेदवारी म्हणून आग्रही नाही. शिफारस करणार नाही., असे सुनिल शेळके स्पष्टपणे म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, इच्छुक राहणे हे गैर नाही. हा संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिला आहे. परंतु, पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल त्या निर्णयाचे स्वागत करायला हवं. पुढे ते म्हणाले, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत कशी फूट पडेल? अजित पवारांच्या सोबत असलेले कार्यकर्ते कसे बाजूला जातील. यासाठी काहीजण प्रयत्न करत आहेत. तो प्रयत्न हाणून पाडू. आमच्या पक्षातील एकमेकांच्या विरोधात उभे राहिल्यास कुणी-कुणी फूट पाडण्याचा प्रयत्न केला. त्यांची नाव व्यासपीठावर जाहीर करणार, असा थेट इशाराच देखील आमदार शेळके यांनी दिला. त्यामुळे आता तालुक्यात काय घडामोडी घडतात हे पाहावे लागेल.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– रेल्वेत हरवलेली बॅग पुन्हा हाती आली आणि तीचे दुःख हरवले ! रेल्वे पोलीस अनिता रायबोले यांना सॅल्यूट
– ब्राम्हणोली येथील शेतकऱ्यांचा विषमुक्त शेती प्रशिक्षण शिबिरात सहभाग । Maval News
– तब्बल वीस वर्षांनी शाळा पुन्हा भरली, रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन शाळेत माजी विद्यार्थ्यांचा मेळावा । Talegaon Dabhade