Dainik Maval News : मावळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ मतदार संघातील देहूगाव आणि देहूरोड परिसरात निवडणुकी दरम्यान शांतता व कायदा सुव्यवस्था राहावी, निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पथसंंचालनाद्वारे शक्ती प्रदर्शन करण्यात आले.
देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली आधी देहूगाव येथे पथसंचलन करण्यात आले. त्यानंतर देहूरोड येथे पथसंचलन करण्यात आले. पोलीस उपायुक्त परिमंडल २ कार्यालयाजवळ पथसंचलनाचा शेवट करण्यात आला.
पथसंचलनात १ सहाय्यक पोलीस आयुक्त, २ पोलीस निरीक्षक, ७ सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, ३५ पोलीस अंमलदार, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे २५ जवान, सीमा सुरक्षा दलाचे ६२ जवान, रेल्वे सुरक्षा दलाचे ५० जवान आणि ६७ हरियाणा पोलीस पथक संचलनात अर्थात रूट मार्च मध्ये सहभागी झाले होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘केवळ मला बदनाम करून तुम्ही ही निवडणूक जिंकू शकत नाही’ : सुनिल शेळके यांचा विरोधकांना टोला
– ‘मी तालुक्यासाठी 4,158 कोटींचा विकासनिधी आणला, तुम्ही निदान 8,000 कोटींचा शब्द तरी द्या’ – आमदार शेळके
– मावळची संस्कृती बिघडवून टाकली ; बापूसाहेब भेगडे यांची आमदार सुनिल शेळकेंवर तीव्र शब्दात टीका । Bapu Bhegade