मावळ तालुक्याचे ( Maval Taluka ) माजी आमदार आणि राज्याचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे ( Bala Bhegade ) यांचे पक्षांतर्गत वजन वाढताना दिसत आहे. दिवसेंदिवस पक्षातील वरिष्ठांशी त्यांची वाढणारी जवळीक पाहता तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या सर्व सामान्य कार्यकर्त्यालाही हुरुप येत आहे.
2019 च्या विधानसभेला संजय उर्फ बाळा भेगडे यांचा सुनिल शेळके ( Sunil Shelke ) यांनी मोठ्या फरकाने पराभव केला. त्याअगोदर बाळा भेगडे हे सलग दोन टर्म आमदार होते. मात्र, निवडणूकीत पराभूत होऊनही बाळा भेगडे खचले नाहीत, त्यांनी जनसंपर्क कायम ठेवला. त्यात राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यांनतर देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून आता त्यांच्या शिरावर नवनवीन जबाबदाऱ्या येत आहे.
हेही वाचा – ‘वेदांता-फॉक्सकॉन कंपनी सोबत तत्कालीन ठाकरे सरकारचा कोणताही MOU नाही’, महायुतीच्या आंदोलनात खुलासा
View this post on Instagram
गोवा राज्यात निवडणूकीत चमत्कार करुन दाखवल्यानंतर आता त्यांची गुजरात राज्य विधानसभेच्या नवसारी जिल्ह्याच्या निरिक्षक पदी निवड केली गेलीये. मात्र, त्यानंतर आता पुन्हा त्यांच्यावर पक्षाने विश्वास दाखवून आणखीन एक मोठी जबाबदारी दिली आहे. ( Maval BJP Bala Bhegde Appointed As Lok Sabha Travel Yojana Maharashtra Coordinator )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
लोकसभा प्रवास योजनेचे महाराष्ट्र संयोजक….
केंद्रीय नेतृत्वाने आता बाळा भेगडे यांची पक्षाच्या संघटनात्मक दृष्ट्या अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या पदाची जबाबदारी दिली आहे. भेगडे यांची लोकसभा प्रवास योजनेच्या महाराष्ट्र संयोजक पदी निवड करण्यात आली आहे. तसे पत्र त्यांना देण्यात आले आहे.
अधिक वाचा –
बाळा भेगडे यांच्यावर पक्षाकडून मोठी जबाबदारी! थेट गुजरात राज्यात करतायेत ‘हे’ खास काम
लम्पी स्कीन : बाळा भेगडे यांच्या प्रयत्नातून मावळ तालुक्यासाठी तातडीने 10 हजार लशी उपलब्ध