काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्याकडे बेहिशोबी 300 कोटीहून अधिकची रोकड मालमत्ता सापडली आहे. या घटनेच्या निषेधार्थ कामशेत शहर भाजपा महिला मोर्चाच्या वतीने साहू यांच्या फोटोला जोडो मारो आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच, भारतीय जनता पार्टी मावळ तालुका महिला आघाडीच्या वतीने तहसीदारांना निवेदन देण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
कामशेत येथील आंदोलनावेळी शंकर शिंदे, कमेश पारटे, अर्जुन शिंदे , माजी सरपंच वसंत काळे, युवा अध्यक्ष प्रविण शिंदे, सोशल मीडिया अध्यक्ष मानस गुरव, सुहास लोणकर, जिल्हा भाजपा महिला सरचिटणीस वैदेही रणदिवे, सुरेखा बच्चे, पल्लवी सुतार, संगिता उनवणे, अर्चना गायकवाड, सपना मगर, लक्ष्मी खोल्लम, कुसुम बेल्हेकर, सोनाली जाधव, पल्लवी वाफळे आदी महिला आणि कार्यकर्ते उपस्थित होते. ( Maval BJP protest against Congress MP Dheeraj Sahu 200 crores corruption )
तर, तहसीलदार यांना आंदोलन देताना, मावळ तालुका महिला आघाडीच्या कार्याध्यक्षा सुमित्रा जाधव, संघटन सरचिटणीस कल्याणी ठाकर, पुणे जिल्हा महिला आघाडीच्या सरचिटणीस सविता गावडे, महिला आघाडीच्या पुणे जिल्ह्याच्या उपाध्यक्षा अलका धानिवले, पुणे जिल्ह्याच्या चिटणीस ज्योती शिंदे, मावळ तालुका सरचिटणीस वैशाली ढोरे, सरचिटणीस स्वाती परीटे, अमृता दिघे, अनिता बाईकर वासावे, सुनिता चिवे, शितल ढाकोळ उपस्थित होत्या.
अधिक वाचा –
– मावळमधील कशाळ व भोयरे गावात मंगळवारी, तर कल्हाट व निगडे गावात बुधवारी ‘विकसित भारत संकल्प यात्रेचे’ आयोजन
– मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवारी पुन्हा ब्लॉक; पाहा कुठे आणि किती वाजता असेल ब्लॉक
– वीज बिलावरील नाव बदलायचंय? अधिकारी – वायरमन अनावश्यक पैसे मागतायेत? ‘या’ नंबरवर करा तक्रार, लगेच होईल कार्यवाही