मावळ तालुका ( Maval Taluka ) भारतीय जनता पार्टीच्या ( BJP ) वतीने वडगाव मावळ ( Vadgaon Maval ) येथील पक्ष कार्यालयात रविवार (16 ऑक्टोबर) रोजी विशेष बैठक घेण्यात आली होती. भाजपचे तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीच्या तालुक्यातील सरपंचाची या बैठकीला उपस्थिती होती. तसेच मार्गदर्शक म्हणून माजी आमदार बाळा भेगडे ( Bala Bhegade ) , तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे ( Ravindra Bhegadae ) यांची उपस्थिती होती.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सदर बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक आणि विकासात्मक बाबीवर सखोल चर्चा करण्यात आली. बाळा भेगडे आणि रविंद्र भेगडे यांनी उपस्थितांना आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. बाळा भेगडे यांनी मावळ तालुक्यातील विविध ग्रामपंचायत विकासकामे आणि संघटनात्मक कामासंदर्भात आढावा घेतला. प्रस्तावित विकासकामाबाबत मार्गदर्शन केले. ( Maval BJP Special Meeting of Functionaries And Sarpanch )
यावेळी भारतीय जनता पक्ष मावळ तालुकाध्यक्ष रविंद्र आप्पा भेगडे, PMRDA सदस्य जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती, सदस्य तसेच विविध ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच तसेच तालुका पदाधिकारी उपस्थित होते.
अधिक वाचा –
Video : सेल्फीचा मोह जीवावर बेतला, पवना नदीत बुडून तरुणाचा मृत्यू
कुख्यात गुंड गजा मारणे जेरबंद, ‘या’ ठिकाणाहून पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या I Pune Crime