Dainik Maval News : मावळ तालुक्यात सध्या ऊस तोड सुरु आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतात ऊस तोड पूर्ण झालीये, त्या शेतकऱ्यांच्या शेतात उसाचे पाचट मोठ्या प्रमाणात आहेत. सहसा शेतकरी हे पाचट एकत्र करून जाळून टाकतात. परंतु याद्वारे वायू प्रदुषण मोठ्या प्रमाणात होत असते. सोबत उसाचे पाचट वाया जाते. या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यात कृषि विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी ऊस पाचट व्यवस्थापन अभियान राबविण्यात येत आहे.
याचाच एक भाग म्हूणन बौर गावात प्रगतशील सुनील ढवळे यांच्या शेतात ऊस पाचट व्यवस्थापन अंतर्गत प्रात्यक्षिक राबविण्यात आले. यावेळी पाचटाची कुट्टी करण्यात आली, त्यानंतर पाचट वर प्रती हेक्टर 80 किलो यूरिया, 100 किलो सिंगल सुपर फॉसफेट व 3 लिटर जिवाणू कल्चर फवारल्यास पाचट कुजले जाते व जमिनीची सुपीकता वाढते, हे दाखविण्यात आले.
पाचट शेतात जाळले असता जमिनीतील जिवाणू मरतात त्यामुळे जमीन नापीक होते. खोडवा उसाची पाचट जाळु नका, पाचट कुजवा जमिनीची सुपीकता वाढवा असे आव्हान कृषि अधिकारी अश्विनी खंडागळे यांनी केले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळवासियांना दिलासा द्यावा… वडगाव मावळ येथे कायमस्वरूपी उपविभागीय कार्यालय सुरू करण्याची मागणी
– आकारी पड जमिनी मूळ खातेदारांना परत केल्या जाणार, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर
– पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची बदली, जितेंद्र डूडी नवे जिल्हाधिकारी म्हणून रुजू ; कोण आहेत जितेंद्र डूडी? जाणून घ्या