वडगाव मावळ : कला, क्रीडा आणि संस्कृतीचा खजिना असलेला मावळच्या संस्कृतीचं दर्शन घडवणारा मावळ फेस्टीवल यंदा दिनांक 26 ते 28 जानेवारी दरम्यान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मावळ फेस्टिवलच्या मंचचे पूजन ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात संपन्न झाले. मावळ फेस्टीवलचे यंदाचे हे 16वे वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ग्रामदैवत श्री पोटोबा-जोगेश्वरी मंदिर प्रांगणात हा फेस्टिवल दररोज सायंकाळी संपन्न होणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ फेस्टिवलच्या मंच पुजनावेळी पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अविनाश बवरे,माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर भोसले, माजी नगरसेवक सुनील ढोरे यांच्या हस्ते मंच पुजन करण्यात आले. तर उद्योजक सोमनाथ ढोरे, ज्येष्ठ मार्गदर्शक वसंतराव भिलारे, उद्योजक खंडूशेठ भिलारे आणि मावळ फेस्टीवलचे संस्थापक प्रवीण चव्हाण, कार्याध्यक्ष गुलाबराव म्हाळसकर, अध्यक्ष सुरेश जांभूळकर आदीजण यावेळी प्रमुख उपस्थितीत होते. ( Maval Festival will be held at Vadgaon from 26th to 28th January )
उपाध्यक्ष विनायक भेगडे, सचिव विवेक धर्माधिकारी, खजिनदार महेंद्र म्हाळसकर,सह.सचिव ॲड.पवन भंडारी, सह.खजिनदार सागर जाधव, संचालक नामदेवराव ढोरे, बाळासाहेब भालेकर, नितीन कुडे, अरुण वाघमारे, शैलेंद्र ढोरे, शामराव ढोरे, जितेंद्र कुडे, रवींद्र काकडे, किरण म्हाळसकर, शंकरराव भोंडवे, भूषण मुथा आदी संस्थेचे सदस्य, नियजोक आणि ग्रामस्थ मंडळी देखील मोठ्या संख्येन उपस्थित होते.
अधिक वाचा –
– मावळमधील कान्हे गावात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत महाशिबिराचे उद्घाटन । Maval News
– नानोली तर्फे चाकण इथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न; दत्तात्रय पडवळ यांच्यामार्फत सर्व विजयी स्पर्धकांना टीशर्ट वाटप
– श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त वडगावमध्ये अनेक धार्मिक कार्यक्रम, हजारो दिव्यांनी उजळणार पोटोबा मंदिराचे प्रांगण । Vadgaon Maval