Dainik Maval News : महाराष्ट्र विधानसभेचा निकाल २३ नोव्हेंबरला जाहीर झाला. मावळ विधानसभा मतदारसंघातून विक्रमी मताधिक्यासह विजय मिळवित महायुतीचे उमेदवार सुनील शेळके सलग दुसऱ्यांदा आमदार झाले. यासोबत आमदार सुनील शेळके यांनी अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. त्यातही शेळके हे मावळ विधानसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा निवडून येणारे पाचवे आमदार ठरले आहेत. यापूर्वी हा मान कृष्णराव भेगडे, मदन बाफना, दिगंबर भेगडे आणि बाळा भेगडे यांना मिळाला होता.
मावळ विधानसभा मतदारसंघातील आजपर्यंतचे आमदार ( Till date MLA from Maval Assembly Constituency )
१. वीरधवल राजे दाभाडे सरकार – १९५२ ते १९५७ – अपक्ष
२. रामभाऊ म्हाळगी – १९५७ ते १९६२ – भारतीय जनसंघ
३. मामासाहेब मोहोळ – १९६२ ते १९६७ – काँग्रेस
४. रघुनाथ दादा सातकर – १९६७ ते १९७२ – काँग्रेस
५. कृष्णराव भेगडे – १९७२ ते १९७८ (जनसंघ), १९७८ ते १९८० (काँग्रेस)
६. ॲड बी एस गाडे पाटील – १९८० ते १९८५ – काँग्रेस
७. ॲड मदन बाफना – १९८५ ते १९९० आणि १९९० ते १९९५ (काँग्रेस)
८. रूपलेखा ढोरे – १९९५ ते १९९९ – भाजपा
९. दिगंबर भेगडे – १९९९ ते २००४ आणि २००४ ते २००९ – भाजपा
१०. संजय तथा बाळा भेगडे – २००९ ते २०१४ आणि २०१४ ते २०१९ – भाजपा
११. सुनील शेळके – २०१९ ते २०२४ आणि २०२४ पासून पुढे – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
मावळ हा १९६७ मध्ये स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ झाला. त्यापूर्वी १९५२ साली सरदार वीरधवल राजे दाभाडे व १९५७ ला जनसंघाचे रामभाऊ म्हाळगी निवडून आले होते. जनसंघाच्या तिकीटावर १९५७ साली रामभाऊ म्हाळगी आणि १९७२ साली कृष्णराव भेगडे निवडून आले होते. १९५७ व १९७२चा अपवाद वगळता १९६२, १९६७, १९७८, १९८०, १९८५, १९९० या सहा निवडणुकीत काँग्रेस पक्षानेच मावळ मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यामुळे पूर्वी मावळ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता.
मात्र, १९९५ हे वर्ष निर्णायक ठरले. त्यावर्षी काँग्रेसमधून बंडखोरी केलेल्या रुपलेखा ढोरे यांना भाजपाने ऐनवेळी उमेदवारी देऊन निवडून आणले. त्यानंतर सलग २५ वर्षांपासून भाजपाचे उमेदवार या मतदारसंघात विजयी झाले. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता. भाजपने काँग्रेसमधील बंडखोरीचा फायदा घेतला. तसाच राष्ट्रवादी काँग्रेसने २०१९ मध्ये भाजपमधील बंडखोरीचा फायदा घेतला. उमेदवारी नाकारल्याने सुनील शेळके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे यांचा ९० हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. त्यानंतर २४ साली सुनील शेळके शेळके यांनी ऐतिहासिक १ लाखाच्या फरकाने आपला सलग दुसरा विजय साकार केला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी आरोपी तरुणाला 20 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ; वडगाव कोर्टाचा निर्णय । Maval Crime
– मोठी बातमी : इंद्रायणी नदीत बुडून मुलाचा मृत्यू… ‘तो’ बुडाला हे मित्रांनी कुणालाच सांगितले नाही, पोलिसांनी ‘असा’ घेतला शोध
– भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी, मावळातील बधलवाडी येथील घटना । Maval Accident News