Dainik Maval News : मावळ तालुक्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींना ग्रामपंचायतीच्या पाच टक्के निधीचा लाभ मिळावा, तसेच पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ मिळावा, अशा विविध मागण्या पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कालिदास प्रधान यांच्याकडे करण्यात आल्या आहेत.
जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून याबाबत निवेदन देण्यात आले. ज्यात दिव्यांग बांधवांची शासकीय योजनांपासून वंचित राहण्याची समस्या मांडत प्रत्येक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात सर्वेक्षण करून ग्रामसेवकांना सूचना देण्याची विनंती करण्यात आली आहे.
निवेदनात स्थानिक कंपन्यांच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (सीएसआर) फंडाचा उपयोग करून दिव्यांग बांधवांना आवश्यक साधने, उपकरणे आणि सेवा पुरवण्याची मागणीही करण्यात आली. दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांचा संपूर्ण लाभ मिळावा यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे. स्थानिक कंपन्यांच्या सीएसआर फंडाचा उपयोग केल्यास दिव्यांग बांधवांसाठी उपयुक्त साधनसामग्री उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
निवेदन देताना नारायण ठाकर, सुभाष शेडगे, सतीश ढमाले, साजन येवले, सारीका ढमाले, संदीप लोखरे व दिव्यांग मित्र बाजीराव ढमाले आदी मान्यवर उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मालमत्ता कराची शंभर टक्के वसुली करण्याचे तळेगाव नगरपरिषदेचे लक्ष्य । Talegaon Nagar Parishad
– लगीनसराई आणि मार्गशीर्ष महिन्यामुळे फुलांना मागणी वाढली ; फूल विक्रेत्यांना सुगीचे दिवस
– युवा कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने शिवसेनेत पक्षप्रवेश ; खासदार श्रीरंग बारणे यांनी केले स्वागत । Maval Lok Sabha