तळेगाव दाभाडे इथे शुक्रवार (दिनांक 9 जून) रोजी महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत मावळ लोकसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांचे संयुक्त मोर्चा संमेलन पार पडले. यावेळी मोदी@9 अभियानाच्या अनुषंगाने मावळ लोकसभा क्षेत्रात सुरू असलेल्या संघटनात्मक कार्याचा आढावा मंत्री लोढा यांनी घेतला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
‘प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आगामी काळात संघटनात्मक जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मागील 9 वर्षामध्ये “सेवा, सुशासन आणि गरिबांचे कल्याण” यासाठी घेतलेल्या लोककल्याणकारी योजनांची आणि विकासकामांची माहिती बूथ स्तरापर्यंत प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन माहिती पोहोच करावी’, अशा सूचना त्यांनी दिल्या. ( maval lok sabha bjp meeting at talegaon in presence of mangal prabhat lodha )
त्याचसोबत, ‘महाराष्ट्रात देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी नागरिकांना केंद्रस्थानी ठेऊन अनेक लोकहिताचे निर्णय मागील काळामध्ये घेतलेले आहेत. त्याची देखील माहिती जनतेपर्यंत मोदी @9 या अभियानाच्या माध्यमातून पोहोचवण्याचे कार्य करावे. मोदी सरकार आणि शिंदे फडणवीस सरकारच आपल्याला न्याय देऊ शकतात, आपला विकास करू शकतात, हा विश्वास सामान्य नागरिकांच्या मनामध्ये कोरावा. पुन्हा एकदा मोदी सरकार आणण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने कार्य करावे’, असे मार्गदर्शन मंत्री लोढा यांनी उपस्थितांना केले.
या संमेलनाला माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, मावळ लोकसभा प्रभारी आमदार प्रशांत ठाकूर, विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे, चिंचवड विधानसभेचे नेते शंकर जगताप, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, मावळ भाजपा अध्यक्ष रविंद्र भेगडे यांच्यासह मावळ लोकसभेतील व मावळ विधानसभेतील सर्व प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते, आजी – माजी लोकप्रतिनिधी, सर्व मंडलांचे अध्यक्ष, सर्व आघाड्यांचे प्रमुख, अभियानाचे प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा –
– कान्हे गावात पार पडला दिंड्यांमधील विणेकऱ्यांचा सन्मान सोहळा; ‘विणेकरी म्हणजे दिंडीचा आत्मा’ – हभप पुरुषोत्तम मोरे
– इंद्रायणीतील जलप्रदूषण रोखण्यासाठी महत्वाची बैठक, जिल्हाधिकाऱ्यांनी केले कान्हे ग्रामपंचायतीचे कौतूक