व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, February 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

ठरलं तर ! मावळातील 25 लाख मतदारांपुढे नवा खासदार निवडण्यासाठी 33 पर्याय, पाहा अंतिम उमेदवार आणि त्याचे निवडणूक चिन्ह

मावळ लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक 29 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत होती. 2 उमेदवारांनी विहित वेळेत आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 29, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर
Maval Lok Sabha Constituency 33 Candidates Will Contest Election

Photo Courtesy : Team Dainik Maval


देशात सध्या लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. मावळ लोकसभा मतदारसंघासाठी आज, दिनांक 29 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत होती. छाननीअंती एकूण 38 उमेदवारांपैकी 35 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यातील 2 उमेदवारांनी सोमवारी विहित वेळेत आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे एकूण 33 उमेदवार मावळ लोकसभेच्या निवडणूकीच्या रिंगणात राहिलेत. तर, दुपारी 3 वाजल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

निवडणूक निरीक्षक बुदिती राजशेखर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि निवडणूक निर्णय अधिकारी दिपक सिंगला यांनी चिन्ह वाटप जाहीर केले. राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांना त्या पक्षांसाठी राखीव असलेली चिन्हे देण्यात आली. नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अन्य उमेदवारांना भारतीय निवडणूक आयोगाने सूचीबद्ध केलेल्या 190 मुक्त चिन्हांमधून उमेदवारांनी दिलेला पसंतीक्रम, त्यांची मागणी विचारात घेऊन तसेच लहान मुलीच्या हस्ते सोडत पद्धतीने चिन्ह वाटप करण्यात आले. त्यामुळे आता मावळ लोकसभा निवडणूकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले असून मावळच्या 25 लाख मतदारांपुढे खासदार म्हणून एकूण 33 पर्याय आहेत. ( Maval Lok Sabha Constituency 33 Candidates Will Contest Election 2 Candidates Withdraw Application See List )

मावळ लोकसभा मतदारसंघाची प्रत्यक्ष निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची माहिती – उमेदवाराचे नाव, पक्षाचे नावे आणि निवडणूक चिन्ह :
1. राजाराम नारायण पाटील (बहुजन समाज पार्टी) – हत्ती
2. श्रीरंग आप्पा चंदू बारणे (शिवसेना) – धनुष्यबाण
3. संजोग भिकू वाघेरे पाटील (शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – मशाल
4. गोविंद गंगाराम हेरोडे (बहुजन मुक्ती पार्टी) – खाट
5. ज्योतीश्वर विष्णु भोसले (बळीराजा पार्टी) – ऊस शेतकरी

6. तुषार दिगंबर लोंढे (बहुजन भारत पार्टी) – शिट्टी
7. पंकज प्रभाकर ओझरकर (अखिल भारतीय परिवार पार्टी) – किटली
8. प्रशांत रामकृष्ण भगत (भारतीय जवान किसान पार्टी) – भेटवस्तू
9. महेश नारायणसिंग ठाकूर (धर्मराज्य पार्टी) – बॅट
10. माधवीताई नरेश जोशी (वंचित बहुजन आघाडी) – ऑटोरिक्षा
11. यशवंत विठ्ठल पवार (क्रांतिकारी जय हिंद सेना) – गॅस सिलेंडर
12. रफीक रशीद कुरेशी (देश जनहित पार्टी) – शाळेचे दप्तर
13. रफिक मैनुद्दीन सय्यद (आझाद समाज पार्टी) – पेनाची निब सात किरणांसह
14. शिवाजी किसन जाधव (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक) – सिंह
15. संतोष मगरध्वज उबाळे (भीमसेना) – जेवणाचे ताट

16. इंद्रजीत धर्मराज गोंड (अपक्ष) – अंगठी
17. मुकेश मनोहर अगरवाल (अपक्ष) – कपाट
18. प्रफुल्ल पंडीत भोसले (अपक्ष) – हिरा
19. मधुकर दामोदर थोरात (अपक्ष) – टायर
20. राहुल निवृत्ती मदने (अपक्ष) – ट्रक
21. सुहास मनोहर राणे (अपक्ष) – टॉर्च बॅटरी
22. मनोज भास्कर गरबडे (अपक्ष) – शिवणयंत्र
23. उमाकांत रामेश्वर मिश्रा (अपक्ष) – कॅमेरा
24. लक्ष्मण सदाशिव अढाळगे (अपक्ष) – टीव्ही
25. इकबाल इब्राहिम नावडेकर (अपक्ष) – जहाज

26. अजय हनुमंत लोंढे (अपक्ष) – नरसाळे
27. अँड. राजू लालसो पाटील (अपक्ष) – सफरचंद
28. दादाराव किसन कांबळे (अपक्ष) – प्रेशर कुकर
29. चिमाजी धोंडिबा शिंदे (अपक्ष) – दुर्बिण
30. राजेंद्र मारूती काटे (अपक्ष) – नारळाची बाग
31. हजरत इमामसाहब पटेल (अपक्ष) – ड्रिल मशिन
32. मारूती अपराई कांबळे (अपक्ष) – तुतारी
33. संजोग रविंद्र पाटील (अपक्ष) – चिमणी

उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांची नावे :
1. गोपाळ यशवंतराव तंतरपाळे (इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टी व अपक्ष)
2. भाऊ रामचंद्र आडागळे (महाराष्ट्र मजूर पक्ष)

अधिक वाचा –
– पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्पनेतून साकारलीये खास ‘दिग्विजय योद्धा पगडी’, काय आहे खासियत? वाचा
– श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला मोगरा महोत्सवाच्या निमित्ताने 50 लाख मोगऱ्यांचा पुष्पनैवेद्य – पाहा सुंदर फोटो
– वडगाव शहरात महाविकासआघाडीने पेटवली संजोग वाघेरे यांच्या प्रचाराची ‘मशाल’ । Vadgaon Maval


Previous Post

अतिवेगामुळे कारचालकाचे नियंत्रण हुकले आणि चिमुकल्यासह 2 नाहक बळी गेले; टाकवे खुर्द हद्दीत महामार्गावर भीषण अपघात

Next Post

धक्कादायक ! लग्न लावून घरी परतत असलेल्या दोन महिलांचे गंठण चोरट्यांनी केले लंपास, कामशेत पोलिसांत गुन्हा दाखल

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
womens mangalsutra snache by thief

धक्कादायक ! लग्न लावून घरी परतत असलेल्या दोन महिलांचे गंठण चोरट्यांनी केले लंपास, कामशेत पोलिसांत गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP candidate Pallavitai Dabhade strong in Induri-Varale Zilla Parishad group on development works

विकासकामांच्या जोरावर इंदुरी-वराळे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार पल्लवीताई दाभाडे यांचे पारडे जड

February 3, 2026
Mahagaon villagers determined to give majority of votes to candidate Dattatray Gund and Simatai Thakar

काले-कुसगांव गटाचे उमेदवार दत्तात्रय गुंड आणि काले गणाच्या उमेदवार सिमाताई ठाकर यांना मताधिक्य देण्याचा महागाव ग्रामस्थांचा निर्धार

February 3, 2026
Voters are determined to bless NCP candidate Deepali Hulawale to build Maval

स्व. अजितदादा पवार यांच्या स्वप्नातील मावळ घडविण्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवार दिपाली हुलावळे यांना मतरूपी आशीर्वाद देण्याचा मतदारांचा निर्धार

February 3, 2026
Voters in Karla Waksai Deoghar Village give positive support to NCP Candidate Deepali Hulavale

कार्ला, वाकसई, देवघर पंचक्रोशीतील मतदारांचा दिपाली हुलावळे यांना सकारात्मक पाठींबा ; मताधिक्य मिळवून देण्याचा शब्द

February 3, 2026
Chandkhed Panchayat Samiti Ganat Late Ajitdada Pawar Raksha Kalash Darshan Yatra

चांदखेड पंचायत समिती गणात स्व. अजितदादा पवार रक्षा कलश दर्शन यात्रा ; श्रद्धांजली अर्पण करताना नागरिकांच्या भावना अनावर

February 2, 2026
Crime

लोणावळा जवळील टायगर पॉइंटच्या दरीत आढळला ‘त्या’ बेपत्ता तरूणीचा मृतदेह

February 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.