मावळ लोकसभेत महायुतीतील घटक पक्षांत नाराजी आहे. शिवसेनेचे उमेदवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी यांच्या पदाधिकारी – कार्यकर्ते यांचा पाठींबा नाही, याची चर्चा सतत होत असते. त्यामुळे थेट दिल्लीतून भाजपाचे सहा जणांचे पथक आले असून ते मावळ लोकसभेत लक्ष ठेवत आहे, तसेच मावळच्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांवर लक्ष ठेवत आहे, अशी चर्चा मागील आठवड्याभरापासून होत होती. परंतू आता ही चर्चा म्हणजे अफवा असल्याचे समजत आहे. याचे कारण महायुतीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी याबाबत स्पष्टोक्ती दिली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ लोकसभेतील शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या कार्यकर्त्यांकडून दिल्लीतून भाजपाचे सहा जणांचे पथक आल्याचे सांगण्यात आले होते. परंतू, प्रत्यक्षात असे कोणतेही पथक आले नसल्याचे भाजपाचे पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी सांगितले आहे. त्यामुळे केंद्रीय पथक ही आता अफवा असल्याचे दिसत आहे. महत्वाचे म्हणजे महायुतीच्या पदाधिकारी – कार्यकर्ते यांना प्रचारात उतरण्यासाठी ही शक्कल लढविल्याचे दिसून आलं. ( Maval Lok Sabha Constituency Mutual opposition in Mahayuti Central BJP Sent Team )
शंकर जगताप म्हणाले की, ‘केंद्राचे कोणते पथक येणार असेल तर राज्याला कळविले जाते. राज्याकडून जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांना कळविले जाते. मावळमध्ये असे कोणतेही पथक आले नाही. याबाबत मी श्रीरंग बारणे यांना विचारेन. महायुतीचे पदाधिकारी एकजुटीने प्रचार करत आहेत. असे कोणतेही पथक आले नाही.’ तसेच, ‘प्रत्येक पक्ष मते मिळविण्यासाठी प्रयत्न करत असतो. मित्रपक्ष शिवसेनेचे वरिष्ठ नेते शहरात येत आहेत. प्रचाराची माहिती घेत आहेत. राष्ट्रवादीचे पदाधिकारी बारणे यांचे काम करत आहेत,’ असे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी सांगितले. एका वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.
अधिक वाचा –
– म्हाळूंगे येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या छाप्यात गावठी दारूसह 2 लाख 68 हजारांचा मुद्देमाल जप्त । Pune Crime
– पुणे जिल्ह्यात भरारी पथकाद्वारे अवैधरित्या मद्य विक्री करणाऱ्यांवर छापे, गावठी दारूचे रसायन आणि मुद्देमाल जप्त । Pune News
– मोठी बातमी! ‘पाणी जपून वापरा, पाणी आल्यावर साठा करून ठेवा’, लोणावळा नगरपरिषदेचे नागरिकांना आवाहन । Lonavala News