व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, March 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अजितदादांच्या आदेशानुसार आप्पा बारणे यांना संपूर्ण सहकार्य – राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष गणेश खांडगे । Maval Lok Sabha

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांनी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे यांची तळेगाव दाभाडे येथे सदिच्छा भेट घेतली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 10, 2024
in लोकल, शहर
Maval-Lok-Sabha-Election

Photo Courtesy : Team Dainik Maval


अजित दादा पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकद लावून लढण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे मावळ तालुक्यातील कार्यकर्ते जोरात तयारीला लागले आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांनी दिली. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांनी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे यांची तळेगाव दाभाडे येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी खासदार श्रीरंग बारणे यांचे जोरदार स्वागत केले. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आप्पा बारणे व खांडगे यांच्यात चर्चा झाली. मावळ लोकसभा मतदारसंघातून मोठ्या फरकाने विजयी होऊ, असा विश्वास श्रीरंग आप्पा बारणे यांनी यावेळी व्यक्त केला. ( Maval Lok Sabha Constituency Shrirang Barane Met NCP Taluka President Ganesh Khandge )

यावेळी श्रीरंग बारणे यांच्या समवेत शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, युवा सेना जिल्हाप्रमुख राजेंद्र तरस, शिवसेनेचे पिंपरी चिंचवड शहर प्रमुख निलेश तरस, देहूगाव शहर प्रमुख सुनील हगवणे, मावळ तालुका संघटक सुनील तथा मुन्ना मोरे आधी पदाधिकारी उपस्थित होते. तर, राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष साहेबराव कारके, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष संदीप कारके, भरत भोते, रूपेश घोजगे, शिवाजी असवले, विक्रम कदम, राज खांडभोर, प्रशांत भागवत,‌ सुहास गरूड, केशव कुल यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.

अधिक वाचा –
– देशात पहिल्यांदाच सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रे! मूळ संकल्पना पुण्याची, शहरातील 35 गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रे
– वडगाव येथे मावळ तालुका महाविकास आघाडीच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन । Vadgaon Maval
– मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ आणि निष्ठावंत वारकरी बांधवांना ‘मावळ रत्न’ पुरस्कार


Previous Post

‘कुणी पैसे वाटले तर घ्या, मत मात्र महाविकास आघाडीलाच करा’, मावळचे उमेदवार संजोग वाघेरेंचा मतदारांना अजब गजब सल्ला । Maval Lok Sabha

Next Post

‘जागरण-गोंधळ या धार्मिक विधीमध्ये काही लोकांनी अश्लीलता आणून त्याचा व्यवसाय चालू केलाय’

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Jagran-Gondhal

'जागरण-गोंधळ या धार्मिक विधीमध्ये काही लोकांनी अश्लीलता आणून त्याचा व्यवसाय चालू केलाय'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.