व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

देशात पहिल्यांदाच सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रे! मूळ संकल्पना पुण्याची, शहरातील 35 गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रे

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी कमी मतदान असलेल्या शहरांमध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांत मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली असून असा उपक्रम देशात प्रथमच राबविण्यात येत आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 10, 2024
in पुणे, ग्रामीण, शहर
Suhas Divse

Photo Courtesy : FB / DIO Pune


लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी कमी मतदान असलेल्या शहरांमध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांत मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली असून असा उपक्रम देशात प्रथमच राबविण्यात येत आहे. या उपक्रमाची मूळ संकल्पना पुणे जिल्ह्याची असून पुणे शहरातील ३५ गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रे स्थापन करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

पुणे जिल्ह्यातील ४ लोकसभा मतदार संघांच्या निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. त्यानुसार बारामती लोकसभा मतदार संघाची अधिसूचना १२ एप्रिल रोजी प्रसिद्ध होणार आहे तर नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत १९ एप्रिल २०२४ अशी आहे. बारामती मतदार संघात नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम मुदत २२ एप्रिल आहे. पुणे, शिरुर आणि मावळ मतदार संघांची अधिसूचना प्रसिद्धी १८ एप्रिल रोजी, नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत २५ एप्रिल तर उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत २९ एप्रिल २०२४ अशी आहे. ( Polling stations in cooperative housing societies for first time in India Start From Pune )

आजपर्यंत पुणे जिल्ह्यात ४३ लाख २८ हजार ९५४ पुरूष, ३९ लाख ६३ हजार २६९ स्त्री तर ७२८ तृतीयपंथी अशा एकूण ८२ लाख ९२ हजार ९५१ मतदारांची नोंद झाली आहे. नवीन मतदार नोंदणीसाठी अर्ज क्र. ६, आणि स्थलांतरणासाठी अर्ज क्र. ८ सादर करण्याची अद्यापही संधी असून बारामती मतदार संघात ९ एप्रिलपर्यंत तर अन्य तीन मतदार संघात १५ एप्रिलपर्यंत आलेल्या अर्जांवर निवडणूक प्रशासनाकडून कार्यवाही केली जाणार आहे. अंतिम मतदारसंख्या त्यावेळी निश्चित होईल.

सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक त्या मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. ५ किंवा ५ पेक्षा जास्त मतदान केंद्रे असलेल्या इमारतीमध्ये वाहनतळाची व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, पाळणाघर, स्त्रीयांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह आदी ठळक सुविधांसह अन्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. मतदारांना मतदान केंद्राची माहिती देण्यासाठी शहरी भागात प्रत्येक वॉर्ड कार्यालयात मदत केंद्र स्थापन करण्यात येणार आहे.

पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघात बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट वितरणाचे कामकाज कोरेगाव पार्क येथील भारतीय अन्नधान्य महामंडळाच्या गोदामातील मतदान यंत्र वितरण केंद्रातून राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत वितरण सुरू झाले आहे. मावळ लोकसभा मतदार संघाची मतमोजणी श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे आणि बारामती लोकसभा मतदार संघाची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील भारतीय अन्नधान्य महामंडळाच्या गोदामात तर शिरूर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी रांजणगाव (कोरेगाव) औद्यागिक वसाहतीतील महाराष्ट्र वखार महामंडळाच्या गोदामात होणार आहे. सर्व मतमोजणी केंद्राची प्रशासन, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, अग्नीशमन यंत्रणा आदी विभागांनी सुरक्षतेच्यादृष्टिने संयुक्त पाहणी केली आहे.

प्रत्येक विधानसभा मतदार संघात नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रिया, ईव्हीएम हाताळणीबाबतचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. निवडणूकीच्या कामकाजासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध असून लोकसभा निवडणूक शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व नियोजन करण्यात आले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

अधिक वाचा –
– लोकसभा निवडणूकीच्या धामधुमीत मावळ तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाला धक्का, अनेकांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
– बेपत्ता चिमुकल्याचा मृतदेह आढळल्याने हळहळ; गुढीपाडव्याच्या पुर्वसंध्येला कराळे परिवारावर कोसळला दुःखाचा डोंगर । Vadgaon Maval
– अखेर महाविकासआघाडीचं ठरलं..! महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांच्या जागा वाटपाची अंतिम यादी समोर । Lok Sabha Election


dainik maval jahirat

Previous Post

वडगाव येथे मावळ तालुका महाविकास आघाडीच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन । Vadgaon Maval

Next Post

लहान मुलांच्या उन्हाळ्याच्या सुटीचे नियोजन पालकांनी कसे करावे? पाहा प्रसिद्ध बालसाहित्यकार डॉ. संगीता बर्वे यांची खास मुलाखत

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Sangeeta-Barve

लहान मुलांच्या उन्हाळ्याच्या सुटीचे नियोजन पालकांनी कसे करावे? पाहा प्रसिद्ध बालसाहित्यकार डॉ. संगीता बर्वे यांची खास मुलाखत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.