वडगाव मावळ येथील रेल्वे जवळील घराच्या अंगणात खेळताना बेपत्ता झालेल्या 8 वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह आढळल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. समर बाळू कराळे (वय 8 वर्षे) हा चिमुकला रविवारी दुपारी 2 वाजल्यापासून बेपत्ता होता. त्याच्या शोधासाठी सर्वजण प्रयत्न करत होते. परंतू काल (सोमवार, दि. 8 एप्रिल) रोजी घराजवळील पोटोबा महाराज मंदिराजवळील ऐतिहासिक तळ्यात त्याचा मृतदेह आढळल्याने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. ( An 8-year-old child died after drowning in the historic pond at Vadgaon Maval ) गुढीपाडवा सणाच्या पुर्वसंध्येला हा अपघात उघडकीस आल्याने कराळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
चिमुकल्याच्या दुर्दैवी मृत्यूनंतर नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया –
“दोन दिवसापासून बेपत्ता असणारा समरचा असा तळ्यात पडून दुर्देवी मृत्यू होणे ही कुटुंबीयांसाठी मोठी धक्कादायक व दुःखद घटना आहे. मात्र या घटनेला जबाबदार कोण ? व कोणाचा निष्काळजीपणा समरच्या जीवावर बेतला! हा ही प्रश्न तितकाच महत्त्वाचा बनला आहे.कदाचित एक सुज्ञ नागरिक म्हणून आपण याची उकल केलीच असावी. शहराच्या मध्यवर्ती व वरदळीच्या ठिकाणी असणारे इतिहासकालीन तळे जे आपण गर्वणी आज पर्यंत तालुक्याला सांगत आलो आहोत. त्याची ही झालेली दुरावस्था व पडझड अपघाताला निमंत्रण देणारीच होती. याचाच प्रत्यय काल चिमुरड्या समरच्या दुर्दैवी मृत्यूने वडगावकरांना आला.
एका बाजूला शहराचा विकास केला म्हणून स्वतःची पाठ थोपून घेणाऱ्या महाभागांना व सत्ताधाऱ्यांना कदाचित तळ्याची ही झालेले दुरावस्था व पडझड सत्तेच्या नशेत दिसली नसावी जर दिसलीच असती तर त्याबाबत सुरक्षिततेची योग्य ती काळजी व खबरदारी ही घेतली गेलीच असती एरवी आठवड्या बाजाराच्या दिवशी कर वसुलीच्या नावाने नगरपंचायत प्रशासन शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडून बक्कळ पैसे जमा करत असते मात्र तळ्याकाठी भरणाऱ्या आठवड्या बाजाराच्या दिवशी तालुक्यातून येणाऱ्या नागरिकांबाबत व बाजाराच्या ठिकाणाबाबत नगरपंचायत प्रशासन कुठेही गांभीर्य विचार करतांना दिसत नाही ही मोठी शोकांतिका आहे. आता तरी निष्पाप बळी घेतलेला तळ्याचा वाली कोण हा ठरवा आणि या पुढील काळात अशा दुर्दैवी घटना घडू नये यासाठी नगरपंचायत प्रशासनाने व भावी सत्ताधाऱ्यांनी आवश्यक त्या उपाययोजना व खबरदाऱ्या घ्याव्यात अशी माफक अपेक्षा.” – रुपेश म्हाळसकर (मनसे)
अधिक वाचा –
– ‘मी कुणाला कुठेही पाठवलं नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका, हलक्या कानाचे राहू नका, विरोधी उमेदवाराला भेटायला जाऊ नका’
– र…राजकारणाचा! ज्याने लेकाचा पराभव केला, त्याच्याच प्रचारासाठी पित्याची धावाधाव । Maval Lok Sabha 2024
– महत्वाचे! मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतुकीत बदल, रविवारपासून ‘या’ वेळेत अवजड वाहनांना ‘नो एन्ट्री’