शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज (दि. 4) मावळ लोकसभेच्या दौऱ्यावर आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात त्यांचा जनसंवाद दौरा आहे. ते मावळ लोकसभा मतदारसंघात पनवेल, खोपोली, उरण या तीन ठिकाणी सभा घेणार आहेत. मात्र मावळ दौऱ्याआधीच उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. मावळ लोकसभेतील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
मावळ लोकसभेत ठाकरे गटाला खिंडार पडले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. ठाकरे गटाचे नवघरचे पंचायत समिती सदस्य दीपक ठाकूर, उरण पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रकांत पाटील, उलवे नोडचे शहरप्रमुख प्रथम पाटील, शाखाप्रमुख विजय भिसे आणि युवासेनेचे नेते क्षितीज शिंगरे यांनी ठाकरे गटातून शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ( Maval Lok Sabha Constituency Uddhav Thackeray Party Leaders Join Eknath Shinde Shiv Sena )
उद्धव ठाकरे यांचा आज मावळ लोकसभा मतदारसंघात जनसंवाद दौरा आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात ते पनवेल, खोपोली, उरण या तीन ठिकाणी सभा घेणार आहेत. दुपारी तीन वाजता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजचं उद्घाटन देखील उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर ते दुपारी चार वाजता पनवेल येथे जनसंवाद सभा घेणार आहेत, त्यानंतर साडेपाच वाजता खोपोलीमध्ये सभा होणार आहे, आणि त्यानंतर संध्याकाळी साडेसात वाजता उरणच्या नवीन सेवा मैदानात उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघाचे सध्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आणि त्यानंतर आता ते तिसऱ्यांदा लोकसभेच्या निवडणूकीसाठी तयारी करत आहेत. तर दुसरीकडे नुकतेच राष्ट्रवादीमधून ठाकरे गटात आलेले पिंपरी चिंचवडचे माजी महापौर संजोग वाघेरे यांना उद्धव ठाकरे मावळ लोकसभेसाठी उमेदवारी देण्याची शक्यता आहे.
अधिक वाचा –
– दैनिक मावळ संवाद : पत्नीसोबत मोमोज खात असताना आयडीया सुचली आणि तिथूनच सुरु झाला नवा प्रवास… । Content Creator & Blogger Manoj Shinguste
– ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्रांचा विकासनिधी वाढवून 5 कोटी केल्याबद्दल वारकरी बांधवांनी मानले अजित पवारांचे आभार! 479 देवस्थानांना होणार लाभ
– अखेर ‘त्या’ 106 शेतकरी कुटुंबियांना न्याय मिळणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन, खासदार श्रीरंग बारणेंच्या पाठपुराव्याला यश । PCMC News