व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अखेर ‘त्या’ 106 शेतकरी कुटुंबियांना न्याय मिळणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन, खासदार श्रीरंग बारणेंच्या पाठपुराव्याला यश । PCMC News

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने 1972 ते 1983 या कालवाधीत संपादित केलेल्या शेतकऱ्यांना 6.2 टक्के परतावा आणि 2 चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) देण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 3, 2024
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
shrirang-barne-and-eknath-shinde

Photo Courtesy : FB / Shrirang Barne


पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने 1972 ते 1983 या कालवाधीत संपादित केलेल्या शेतकऱ्यांना 6.2 टक्के परतावा आणि 2 चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) देण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. याबाबतचा प्रस्ताव आगामी मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुर केला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. त्यामुळे लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी हा प्रश्न निकाली निघेल अशी माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली. या निर्णयाच्या 106 कुटुंबियांना फायदा होणार आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

प्राधिकरण बाधित शेतकऱ्यांच्या परताव्याचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील महिन्यात शहरात आल्यानंतर परताव्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वसान दिले होते. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेच्या खासदारांची बैठक घेतली. या बैठकीत खासदार बारणे यांनी साडेबारा टक्के परताव्याचा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली. त्यावर पुढील मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. ( Pimpri Chinchwad Navnagar Development Authority will give fair compensation to 106 farmers who have acquired land )

खासदार बारणे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या विकासासाठी प्राधिकरणाने सन 1972 पासून सन 1983 पर्यंत शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केलेल्या आहेत. 1972 ते 1983 आणि 1984 नंतर दुसरा टप्पा संपादित झाला. 1984 नंतरच्या बाधित शेतकऱ्यांना मोबादला मिळाला. पण, 1972 ते 1983 दरम्यान जमिनी संपादित झालेल्या 106 बाधित शेतकऱ्यांना कुठलाही मोबादला मिळाला नव्हता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना परतावा देण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. बाधित शेतक-यांसाठी पीएमआरडीएने भुखंड आरक्षित ठेवला आहे. सव्वासहा टक्क्याने डबल एफ एस आय परतावा शेतक-यांना मिळणार आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी हा निर्णय होणार आहे. 106 कुटुंबिय मोठ्या प्रमाणात विस्तारली आहेत. त्यांना या निर्णयाचा फायदा होईल.

अधिक वाचा –
– आण्णांचा आप्पांना विरोध! मावळ लोकसभेत नेमकं चाललंय काय? विद्यमान लोकप्रतिनिधींच्या भूमिकांची राज्यभर चर्चा । Maval Lok Sabha Election 2024
– महत्वाची बातमी! पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर पुन्हा मेगाब्लॉक, लोकलच्या 14 फेऱ्या रद्द, पाहा यादी । Mega Block on Pune Lonavala Railway Route
– वाकसई ग्रुप ग्रामपंचायतीमधील विविध विकास कामांचे भूमिपूजन, आमदार सुनिल शेळकेंची उपस्थिती । Maval News


Previous Post

‘सारथी’ संस्थेमार्फत राज्यातील तब्बल 47 गड-किल्ल्यांवर स्वच्छता मोहिम, 8 हजार 586 विद्यार्थ्यांचा सहभाग

Next Post

‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्रांचा विकासनिधी वाढवून 5 कोटी केल्याबद्दल वारकरी बांधवांनी मानले अजित पवारांचे आभार! 479 देवस्थानांना होणार लाभ

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
ajit-pawar-warkari

'ब' वर्ग तीर्थक्षेत्रांचा विकासनिधी वाढवून 5 कोटी केल्याबद्दल वारकरी बांधवांनी मानले अजित पवारांचे आभार! 479 देवस्थानांना होणार लाभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Proposed Baur-Karunj-Brahmanwadi MIDC project Local villagers continue to oppose

प्रस्तावित बऊर-करुंज-ब्राह्मणवाडी एमआयडीसी प्रकल्प : स्थानिक ग्रामस्थांचा विरोधी सूर कायम

June 6, 2026
Accident

Lonavala Accident : लोणावळ्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; एकाचा मृत्यू, अन्य प्रवासी जखमी

June 4, 2026
MP Shrirang Barne

MP Shrirang Barne : बारा वर्षात लोकसभेतील चर्चेत सर्वाधिक सहभाग ; ३६ खासगी विधेयके सादर, ९६ टक्के उपस्थिती

June 4, 2026
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla

आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर ; ७ जुलैला होणार पंढरपूरकडे प्रस्थान

June 4, 2026
grand blood donation camp was organized at Vadgaon Maval on Saturday

वडगाव मावळ येथे शनिवारी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 4, 2026
Severe water shortage in remote villages in Andar Maval Women walk for water

धरणे उशाला अन् कोरड घशाला! आंदर मावळातील दुर्गम वाडीवस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई; महिलांची पाण्यासाठी पायपीट

June 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.