व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, May 31, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘सारथी’ संस्थेमार्फत राज्यातील तब्बल 47 गड-किल्ल्यांवर स्वच्छता मोहिम, 8 हजार 586 विद्यार्थ्यांचा सहभाग

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून सारथी संस्थेमार्फत सरदार हिरोजी इंदलकर सारथी किल्ले संवर्धन उपक्रमाअंतर्गत राज्यातील 47 गड किल्यांवर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 3, 2024
in महाराष्ट्र, ग्रामीण, पुणे, शहर
sarthi-Cleanliness-campaign

Photo Courtesy : Team Dainik Maval


छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून सारथी संस्थेमार्फत सरदार हिरोजी इंदलकर सारथी किल्ले संवर्धन उपक्रमाअंतर्गत राज्यातील 47 गड किल्यांवर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष अजित निंबाळकर व मान्यवरांच्या उपस्थित लाल महाल येथे छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन सरदार हिरोजी इंदलकर सारथी किल्ले संवर्धन उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

स्वच्छता मोहिमेत संस्थेचे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्याथी, कौशल्य विकास अंतर्गत एमकेसीएल मध्ये प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी, सातारा व कोल्हापूर येथील शालेय विद्यार्थी अशा 8 हजार 586 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सारथी संस्थेमार्फत प्राधिकृत 15 प्रशिक्षण संस्थांनीही यामध्ये सहभाग नोंदवला. किल्ले स्वच्छता उपक्रमात विद्यार्थ्यांनी 11 हजार 998 प्लास्टीकच्या बाटल्या, 645 काचेच्या बाटल्या व 6 हजार 923 प्लास्टिक पिशव्या गोळा केल्या. हा सर्व कचरा 212 गोण्यांमध्ये भरुन नगरपालिकेकडे व प्लास्टीक प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांकडे देण्यात आला. ( Cleanliness campaign on 47 forts in maharashtra through Sarathi organization 8 thousand 586 students participated )

  • रायगड, रायरेश्वर, शिवनेरी, पुरंदर, सिंहगड, राजगड, लालमहल, शनिवारवाडा, बालापूर, बदूर, खर्डा, देवगिरी, गाविलगड, किल्ले धारुर, माणिकगड, गोंडराजा, माहूरगड, प्रतापगड, वसंतगड, कल्याणगड (नंदगिरी), मल्हारगड, सिंधुदूर्ग, भोईकोट, मच्छिंद्रगड, बाणूरगड, रामपूर, सिंदखेडराजा, रत्नदुर्ग, लिंगाणा, पन्हाळा, भुदरगड, विशाळगड, अजिंक्यतारा, चंदन, वंदन, रामशेज, नगरधनगड, तोरणा इत्यादी गड किल्यांवर ‘सप्तपदी स्वच्छतेची’ व ‘स्वच्छ भारत अभियान’अंतर्गत स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.

सारथी प्रायोजित एच.व्ही.देसाई कॉलेजच्या 370 विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज शिवजन्मोत्सव सोहळा 2024 रथोत्सव मार्गावर स्वच्छता मोहिम राबविली. तसेच छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात स्वछता करण्यात आली. या किल्ले संवर्धन उपक्रमातील विद्यार्थ्यांना सारथी संस्थेमार्फत सहभाग प्रमाणपत्र व स्वच्छता करत असताना बनविलेल्या उत्कृष्ट रिल्स, शॉर्ट व्हिडीओ इत्यादी बक्षीस म्हणून देण्यात येणार असून यानिमित्तने एच.व्ही.देसाई कॉलेज येथे मान्यवरांच्या उपस्थित राजगडावरील माहिती देणारी चित्रफीत दाखविण्यात आली.

उपक्रमास सारथी संस्थेचे संचालक उमाकांत दांगट, नवनाथ पासलकर, मधूकर कोकाटे, नानासाहेब पाटील, व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे व सारथीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमाविषयी बोलताना संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक श्री. काकडे यांनी सरदार हिरोजी इंदलकर सारथी किल्ले संवर्धन उपक्रमामध्ये गड किल्ले परिसरात स्वच्छतेसोबतच लक्षित गटाच्या विद्यार्थ्यांसाठी टुरिस्ट गाईड प्रशिक्षण सारथी मार्फत देण्याचे नियोजित असल्याचे सांगितले.

अधिक वाचा –
– महत्वाची बातमी! पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर पुन्हा मेगाब्लॉक, लोकलच्या 14 फेऱ्या रद्द, पाहा यादी । Mega Block on Pune Lonavala Railway Route
– वाकसई ग्रुप ग्रामपंचायतीमधील विविध विकास कामांचे भूमिपूजन, आमदार सुनिल शेळकेंची उपस्थिती । Maval News
– वेहेरगाव-दहिवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या नवीन ग्रामपंचायत कार्यालयाचे आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते उद्घाटन । Maval News


Previous Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा! शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना

Next Post

अखेर ‘त्या’ 106 शेतकरी कुटुंबियांना न्याय मिळणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन, खासदार श्रीरंग बारणेंच्या पाठपुराव्याला यश । PCMC News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
shrirang-barne-and-eknath-shinde

अखेर 'त्या' 106 शेतकरी कुटुंबियांना न्याय मिळणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन, खासदार श्रीरंग बारणेंच्या पाठपुराव्याला यश । PCMC News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

internationally renowned wildlife photographer Abhay Kewat from Maval Completed 1006 birds photograph

मावळातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वन्यजीव छायाचित्रकार अभय केवट यांचा भीमपराक्रम ! १००६ पक्ष्यांचे छायाचित्रीकरण केले पूर्ण

May 30, 2026
Bhoyre Savala route is becoming faster Demand to install speed breakers at necessary places Maval Taluka

भोयरे-सावळा मार्ग बनतोय वेगवान ; सुरक्षिततेसाठी आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी

May 30, 2026
Shiv Sena Shinde Faction Maval MP Shrirang Barne

पिंपरी-चिंचवडमधील अवैध धंद्यावर कडक कारवाई करा ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पोलिसांना सूचना

May 30, 2026
Panchayat Samiti Education Department Maval NCP Students Congress honored students of class 10th and 12th

पंचायत समिती शिक्षण विभाग आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मावळ तालुका यांच्यावतीने दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

May 29, 2026
INS Shivaji employee dies after falling into a gorge at Lions Point Lonavala

लोणावळा लायन्स पॉइंट येथील दरीत पडून ‘आयएनएस शिवाजी’मधील कर्मचाऱ्याचा मृत्यू

May 29, 2026
Group prayers onthe occasion of Bakri Eid at Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथे बकरी ईद निमित्त सामूहिक नमाज पठण

May 29, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.