Maval Lok Sabha Election Ajit Pawar Rally : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित दादा पवार यांची जाहीर सभा काल (दि. 9 मे) कामशेत (ता. मावळ) येथे पार पडली. महायुतीचे मावळ लोकसभेचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने अजितदादांची ही सभा संपन्न झाली. या सभेत बोलत असताना अजित दादांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना उघड उघड दम दिला, आणि कानउघाडणीही केली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजोग वाघेरे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महायुतीकडून शिवसेना पक्षाचे श्रीरंग बारणे हे तिसऱ्यांदा निवडणूकीच्या रिंगणात आहेत. शिवसेनेच्या दोन्ही गटातील ही कांटे की टक्कर असणार आहे. त्यामुळे अजित पवारांनी महायुतीच्या उमेदवाासाठी अर्थात बारणेंसाठी गुरुवारी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी अजितदादांनी कार्यकर्त्यांना काही महत्वाच्या सूचना केल्या.
आपला उमेदवार श्रीरंग बारणेच –
भाषणा दरम्यान बोलताना अजित पवार म्हणाले की, ‘राष्ट्रवादीची इथे ताकद आहे. सुनिल शेळके, बापू भेगडे, गणेश खांडगे आणि इतर काम करतायेत पण खालची टीम जरा गडबड करतेय. मला हे चालणार नाही. माझं बारकाई लक्ष. सुनिलने सांगितलंय नंतर बघू, पण माझ्याकडं मी तर कामच करून टाकेन. माझ्याकडे त्याला फुरसत नाही. आपला उमेदवार महायुतीचा श्रीरंग आप्पा बारणे धनुष्यबाण. त्याशिवाय दुसरा आपल्यापुढे पर्याय नाही, हे लक्षात ठेवा,’ असं स्पष्ट शब्दात अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना बजावले.
मावळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कुठंही दगाफटका करायचा नाही, असं सांगत असतानाच अजित पवार यांनी मविआ चे उमेदवार संजोग वाघेरे यांचा आतून प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांना स्पष्टपणे सज्जड दम दिला. ( Maval Lok Sabha Election Ajit Pawar rally at Kamshet gave Warning to party workers )
अधिक वाचा –
– वडगाव शहरातील पायी ‘मशाल’ रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद, ‘आता फक्त संजोग वाघेरे पाटील..’ गीताने दणाणला परिसर
– तळेगाव दाभाडे शहरात चोरट्यांची दहशत, भरदिवसा केला गोळीबार आणि… । Talegaon Dabhade Crime
– मतदान वाढीसाठी सहकार विभागाचे विशेष प्रयत्न, येत्या 13 मे रोजी मावळ, शिरूर आणि पुणे लोकसभेसाठी होणार मतदान