मावळ लोकसभा मतदारसंघासाठी येत्या 13 मे रोजी मतदान होणार आहे. त्याअनुषंगाने मावळ लोकसभेतील सहाही विधानसभा मतदारसंघात निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी यांच्या प्रशिक्षणाची लगबग सुरु आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
33 मावळ लोकसभा मतदारसंघ अंतर्गत 204 मावळ विधानसभा मतदारसंघ आहे. या क्षेत्रात लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने तळेगाव दाभाडे येथील नूतन कॉलेज ऑफ इंजिनियरिंग येथे बुधवार (दि. 3 मे 2024) रोजी ईव्हीएम हाताळणीचे आणि प्रिपरेशनचे ट्रेनिंग देण्यात आले. ( Maval Lok Sabha election EVM handling Training to 130 officials at Talegaon )
एकूण 130 अधिकारी कर्मचारी यांना ईव्हीएम बाबत प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले, मावळ तहसीलदार विक्रम देशमुख, निवासी नायब तहसीलदार तथा प्रशिक्षण विभाग प्रमुख गणेश तळेकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– दहिवली-कार्ला येथील सामुदायिक विवाहसोहळ्यात 5 जोडपी विवाहबद्ध, हजारो वऱ्हाड्यांनी दिले अक्षतारूपी आशीर्वाद
– ‘गेट टूगेदर करा आणि आयुष्य वाढवा’ – प्रा. हेमंतकुमार डुंबरे
– वडगाव मावळ येथील गुटखा विक्रेत्यावर IPS सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाची कारवाई; सुमारे दीड लाखांचा गुटखा जप्त