सोमवारी (दि. 13 मे) शिरूर, पुणे सह मावळ लोकसभा मतदारसंघात देखील मतदान पार पडले. मावळ लोकसभा मतदारसंघात यंदा काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्यात मावळ लोकसभेत कडवी लढत होत आहे. मतदानानंतर राजकीय वातावरण काहीसे थंडावले असले तरीही निकालाबद्दल विविध अंदाज लावले जात आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ लोकसभेत यंदा 54.87 टक्के मतदान झाले. त्यामध्ये सर्वाधिक मतदान हे उरण विधानसभा मतदारसंघात 67.07 टक्के इतके झाले. मतदानाची आकडेवारी समोर आल्यापासून दोन्ही बाजूंनी विजयाबद्दल खात्री व्यक्त केली जात आहे. तसेच कुणाला किती मते पडतील, ह्याबद्दलही विश्वास व्यक्त केला जातोय. मावळ लोकसभेत ठाकरेंकडून संजोग वाघेरे पाटील तर शिंदेंकडून श्रीरंग बारणे हे तिसऱ्या टर्मसाठी निवडणूकीच्या रिंगणात होते. दोन्ही बाजूंनी प्रचार देखील तोडीसतोड झाला होता. त्यामुळे अंतिमतः निकाल काय लागेल, हे सांगणे कठीण आहे. मात्र स्वतः संजोग वाघेरे यांनी याबद्दल आता भाष्य केले आहे. ( Maval Lok Sabha Election Sanjog Waghere expressed confidence of victory Shrirang Barane will be defeated )
संजोग वाघेरे यांनी थेट लीडचा आकडाच सांगत विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल हा येत्या 4 जून रोजी लागणार आहे. मात्र त्याआधीच मावळ मतदारसंघातून 1 लाख 72 हजार 704 मतांनी विजय होईल, असा दावा संजोग वाघेरे यांनी केला आहे. तसेच दोन वेळा खासदार राहिलेल्या श्रीरंग बारणे यांना फक्त पनवेलमधून लीड मिळेल, असा अंदाज देखील वाघेरे यांनी मांडला आहे. त्यामुळे येत्या 4 जूनला लागणाऱ्या निकालात नक्की कोण बाजी मारणार? त्याची उत्सूकता अधिक ताणली गेलीये.
अधिक वाचा –
– मोदींचा सत्कार करताना जिरेटोप भेट, ‘छत्रपतींचा जिरेटोप चढवला आता सिंहासनावरही बसवणार का?’, महाराष्ट्रात संतापाची लाट – Video
– शिलाटणे येथे वादळी वाऱ्यामुळे घरांचे पत्रे उडाल्याने नागरिकांची तारांबळ, कार्ल्यात चारचाकी वाहनाचे झाले नुकसान
– नायगावमधील युवकाचा कामशेत येथे इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू, परिसरात पसरली शोककळा । Maval News